जयसिंगपूर : तमदलगे (ता. शिरोळ) येथील ग्रा. पं. कर्मचारी नंदकुमार गुरव यांनी कोरोना काळात काम करणाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले. गेली कित्येक वर्षे झाले कुटुंबातील व्यक्ती मयत झाल्यास ग्रामपंचायतीकडून अंत्यविधी अनुदान मिळते. काही दिवसांपूर्वी गुरव यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. या अनुदानाच्या रक्कमेतून गुरव यांनी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. हेरवाडमध्ये कडक लॉकडाऊन
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी विनाकारण बाहेर फिरू नये. बाहेर फिरताना आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे ग्रामस्थांनी घरी राहून ग्रामपंचायतीला सहकार्य करा, असे आवाहन सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केले आहे.
हेरवाडमध्ये कोविड सेंटरसाठी प्रयत्न
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथे लोकसहभागातून कोविड सेंटर सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव, बबलू पाटील यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. या सेंटरसाठी ज्यांना मदत करावयाची असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन जाधव व पाटील यांनी केले आहे.