इचलकरंजी : शहापूर (ता. हातकणंगले) येथील नागरिकांनी स्मशानभूमीची स्वच्छता केली. स्मशानभूमीतील सर्व वस्तू निटनेटक्या ठेवल्या. या मोहिमेमुळे शहापूर स्मशानभूमीचा परिसर स्वच्छता झाला. स्वच्छता मोहिमेत नगरसेवक नितीन कोकणे, रणजित अनुसे, रमेश पाटील, दादा उगळे, अस्लम सनदी आदी सहभागी झाले होते.
आॅनलाईन मुक्त चर्चासत्र
इचलकरंजी : छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे आॅनलाईन मुक्त चर्चासत्र झाले. चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी सध्याची शिक्षण व्यवस्थेची अवस्था या विषयावर मते मांडली. लॉकडाऊन व शिक्षण, आॅनलाईन शिक्षण व विद्यार्थी, पालक, विस्कळीत झालेली शिक्षण अवस्था, विद्यार्थ्यांची शैक्षणिक मानसिकता या विषयावर मतमतांतरे व्यक्त झाली.
सहारा फाउंडेशनची मदत
इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथील सहारा फाउंडेशनने हिंदू स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तानासाठी झाडे, पाट्या, खोरे, कुदळ, आदी साहित्य दिले. हातकणंगले पंचायत समितीच्या माजी सभापती रेश्मा सनदी यांच्या हस्ते विवेकानंद फाउंडेशन व मुस्लिम जमियतकडे हे साहित्य देण्यात आले. उत्तम जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बाळासाहेब देसाई, अभय काश्मिरे, शब्बीर वालीकर, महादेव कांबळे, सुधीर लिगाडे, आदी उपस्थित होते.