जयसिंगपूर : नांदणी ते भैरववाडी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. कुरुंदवाडहून जयसिंगपूरकडे येण्यासाठी या मार्गाचा सर्रासपणे दुचाकीधारक वापर करीत असतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, रस्त्याचे काम पूर्ण होऊन रस्ता सुरळीत झाल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे.
--------------------
माउली कोविड सेंटरमध्ये पहिला रुग्ण कोरोनामुक्त
शिरोळ : हेरवाड (ता. शिरोळ) येथील माउली कोविड सेंटरमधून राहुल इटाज हा पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला. या वेळी त्याच्यावर फुलांचा वर्षाव करून अभिनंदन करण्यात आले. या वेळी प्रथमेश पाटील, माजी तंटामुक्त अध्यक्ष गिरीश पाटील, पूजा पाटील, सागर वाळके, विनय खडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. लोकसहभागातून प्रथमेश पाटील यांनी या कोविड सेंटरची निर्मिती केली आहे. या सेंटरसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी दातृत्वांनी पुढे यावे, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
----------------------
कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा
जयसिंगपूर : येथील डेबॉन्स कॉर्नर परिसरातील स्वच्छतागृहाजवळ कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. पावसामुळे पाणी साचून डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न समोर येत आहे. दरम्यान, पालिकेने याठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.