नृसिंहवाडी : नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे ग्रामपंचायतीच्या आरोग्य सेवेतील कर्मचारी, अधिकारी आणि कर्मचारी यांना रोगप्रतिकारकशक्तीचे औषध वाटप करण्यात आले. प. पू. रविशंकर यांच्या आशिर्वादाने इचलकरंजी येथील डॉ. नितीन मोकाशी आणि डॉ. रजनी मोकाशी यांच्या सहकार्याने पोलीस फ्रेंडस् वेल्फेअर असोसिएशन जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश सारडा यांच्या सहकार्याने जिल्हाध्यक्ष अॅड. विजय जमदग्नी आणि कुरुंदवाड शहराध्यक्ष उत्कर्ष निकम यांनी रोगप्रतिकारक शक्तीचे औषध नृसिंहवाडी ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या उपस्थित वाटप केले.
------------------------
पालिका कर्मचा-यांना सुविधा द्या
जयसिंगपूर : कोरोना रुग्णांवर उपचार करताना सोयीसुविधा उपलब्ध केल्या जातात. त्याच प्रकारच्या सोयीसुविधा स्मशानभूमीवर मृत कोविड रुग्णांचा अंत्यविधी करणा-या नगरपरिषदेच्या कर्मचा-यांना द्यावा, अशा मागणीचे निवेदन बहुजन सेवा संघाच्यावतीने जयसिंगपूर नगरपालिकेला देण्यात आले. निवेदनावर नितीन कांबळे, गुरूनाथ माने, योगेश वाघवेकर, वासुदेव भोसणे, प्रवीण शिंदे, संतोष सासणे, रोहित कोठावळे यांच्या स्वाक्ष-या आहेत.
----------------------
जयसिंगपुरात खरेदीसाठी गर्दी
जयसिंगपूर : शहरात मंगळवारी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र पाहवयास मिळाले. कोरोना महामारीमुळे सकाळी सात ते अकरा या वेळेत खरेदीसाठी मुभा देण्यात आली असली तरी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे पालिकेने नियम न पाळणा-यांवर कारवाई करण्याची गरज आहे.