जयसिंगपूर : तालुक्यात गुरुवारी दुपारी दमदार पाऊस झाला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. दिवसभर उन्हामुळे हवेत उष्मा वाढला होता. त्यामुळे अनेकजण उकाड्याने हैराण झाले होते. दुपारी तीन वाजता पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. हा पाऊस शेतीसाठी लाभदायक ठरला आहे.
--
शिरोळमध्ये गतिरोधक बसवा
शिरोळ : येथील ग्रामीण रुग्णालय ते जनता हायस्कूलकडे जाणा-या मार्गावर गतिरोधक बसविण्याची गरज आहे. मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरुन भरधावपणे वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे शहरातून जाणा-या या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. तरी या मार्गावर गतिरोधक बसविल्यास वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहणार आहे.
-
-- हेरवाडमध्ये ड्रेनेजची स्वच्छता करा
कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील कन्या शाळेजवळ असणा-या गटारींची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे. गटारीशेजारी घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे गटारींच्या स्वच्छतेबरोबर गटारीशेजारी उगविलेली झुडपे काढावीत, अशी मागणी होत आहे.