इचलकरंजी : कोरोनाच्या परिस्थितीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनने रक्तदान शिबिर आयोजित केले. त्यास प्रतिसाद मिळाला. त्याचे उद्घाटन पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील यांनी केले. ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. अनिल हेगडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच शोभा पवार, उपसरपंच सुधीर पाटील, ग्रामविकास अधिकारी बी.टी. कुंभार, सुधीर लिगाडे आदी उपस्थित होते. अण्णाप्पा वडर यांनी आभार मानले.
कोविड केंद्राचे उद्घाटन
कबनूर : ग्रामपंचायत व कबनूर मेडिकलच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केंद्राचे उद्घाटन पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.एम. पाटील यांनी केले. डॉ. विजय इंगवले यांनी श्री धन्वंतरी मूर्तीचे पूजन केले. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जयकुमार कोले, बी.डी. पाटील, विजया पाटील, जे.आर. गोन्सालविस आदी उपस्थित होते.