कोल्हापूर : ‘माझी वसुंधरा अभियाना’ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी हरित शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
--
लोककला व पथनाट्य संस्थांनी २१ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत
कोल्हापूर : लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांची निवडसूची २० डिसेंबरला संपुष्टात आली आहे. नव्या सूचीसाठी लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कोल्हापूर येथे २१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे. निवडसूचीसाठी dgipr.maharashtra.gov.in व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाबरोबरच कार्यालयात उपलब्ध आहेत.