कोल्हापूर : मालक व कामगार संघटना यांनी महागाई भत्त्याची १ जानेवारीपासून अंमलबजावणी करावी व औद्योगिक शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन इचलकरंजीच्या साहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांनी बुधवारी केले आहे.
दिनांक २८ मार्च २०१३ च्या संयुक्त करारानुसार होणाऱ्या वाढीव महागाई भत्याबाबत १ जानेवारीपासून महागाई भत्त्याची वाढ पिस रेटवर रूपांतरित करून ०. ०८३ पैसे एवढी होत आहे. ती पूर्णांकामध्ये आठ पैसे (५२ पिकास मीटरवर आधारित) होत आहे. ही महागाई भत्ता वाढ यंत्रमागमधील सर्व कामगारांना अदा करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
--
बेवारस वाहनांची माहिती द्या
कोल्हापूर : शहरात वाहतुकीस अडथळा होतो अशा प्रकारे उभ्या असलेल्या बेवारस वाहनांची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांना ९९२३७९९७०९ या क्रमांकावर व्हॉटसॲपद्वारे कळवावी, असे आवाहन शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे. ही माहिती कळल्यास शहरात वाहतुकीस अडथळा होणार नाही, अशी कार्यवाही केली जाईल; तर शहरातील दक्ष नागरिकांनी वरील ॲपद्वारे बेवारस वाहनांची माहिती देऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
-
शेतकरी उत्पादक अभ्यासक्रमासाठी नावनोंदणीचे आवाहन
कोल्हापूर : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक यांनी सहयोग व विशेष उपक्रम केंद्रांतर्गत रामेती, कोल्हापूर या संस्थेस शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे. हा अभ्यासक्रम सहा महिने (आठवड्यातून एकदा) कालावधीचा असून, तो १ फेब्रुवारी ते जून या कालावधीत सुरू होत असून इच्छुक उमेदवारांनी दि. ३१ जानेवारीपूर्वी http://ycmou.digitaluniversity.ac व www.ycmou.ac.in या लिंकद्वारे नावनोंदणी करून प्रवेश निश्चित करावेत, असे आवाहन प्रादेशिक कृषिविस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
-