कोल्हापूर : कोरोनामुळे अनुसूचित जातीच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी स्माइल ही व्यवसायासाठी कर्ज योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी ३० जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (३ लाखांपर्यंत), काेरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड, वयाचा पुरावा ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात किंवा https://forms,gle/7mG8CMeeLkmWGt6K7 या लिंकवर माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
कोल्हापूर : राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हे प्रशिक्षण मोफत दिले जाणार असून जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रामध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या किंवा यापूर्वी आरोग्य क्षेत्रात काम केलेल्या इच्छुक युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रांचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात १८ ते ४५ वयोगटातील बेरोजगार युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग, डोमेस्टिक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामधील विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण, कौशल्य विकसित करून, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मोफत प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी आपली माहिती https://forms.gle/gBfxSv7DtBjQ4vhH7 या लिंकच्या आधारे नोंदवावी किंवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---