कोल्हापूर : डिसेंबर महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवारी (दि. २१) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या लोकशाही दिनास पीडित महिलांनी त्यांच्या तक्रार अर्जासोबत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. डी. शिंदे यांनी केले आहे.
--
आयटीआयतर्फे स्वच्छता अभियान
कोल्हापूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) एनएसएस विभाग व महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर चौक ते कळंबा कारागृह परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात पदपथाच्या बाजूची झुडपे, पालापाचोळा अशा दोन टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी प्राचार्य रवींद्र मुंडासे, उपप्राचार्य दत्तात्रय पाठक, महापालिका मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, एनएसएस प्रमुख अमोल आंबी, उत्तम माने, स्वयंसेवकांसह कार्यालयीन पदाधिकारी उपस्थित होते.
---
इंदुमती गणेश