कोल्हापूर : लेखक विश्वास सुतार लिखित महात्मा बसवण्णा : जीवन व संघर्ष या पुस्तकाचे प्रकाशन लेखक राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिरगुप्पे यांनी बसवण्णांचे विचार भक्तिप्रधान नसून ते विचारप्रधान आहेत. हे विचार समजून घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी डॉ. दयानंद ठाणेकर होते. यावेळी शोभा चाळके, अधिक चाळके, विमल पोखर्णीकर, यश तांबोळी, रवी सरदार, संजय नाझरे आदी उपस्थित होते.
-
अनुराधा भोसले यांचा सन्मान
कोल्हापूर : सातारा येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसार मंडळातर्फे अवनि संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले यांचा राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ विचारवंच डॉ. वृषाली रणधीर उपस्थित होत्या.
यावेळी प्रसाद शिंदे, प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, डॉ. रोहिदास जाधव, अरुण बुरांडे उपस्थित होते.
--
वर्धापनदिनानिमित्त विषेशांकाचे प्रकाशन
कोल्हापूर : हस्तकला कारागीर कामगार कल्याण संघाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयराज कोळी व तुकाराम सातपुते यांच्या हस्ते विशेष अंकाचे प्रकाशन झाले.
यावेळी कोळी यांनी हस्तकला कारागीर अनेक योजनांपासून वंचित असून त्यांना शासनाने पेन्शनरूपात मदत करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपक यादव यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. शहराध्यक्ष महेश सूर्यवशी यांनी प्रास्ताविक केले. तर राजू सावंत यांनी आभार मानले.
--
अध्यक्षपदी किरणसिंग शिलेदार
कोल्हापूर : आम आदमी पार्टीच्या कायदेशीर सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड. किरणसिंग शिलेदार यांची निवड करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी मंडळावरील निवडीची घोषणा केली.
यावेळी ॲड. मनोहर बडदारे, ॲड. महादेव पाटील, ॲड विनायक खांडेकर, ॲड. सरबतशहार फकीर, ॲड. मनीषा सातपुते, ॲड. अनिल शिंदे यांची सदस्य म्हणून निवड झाली.
--