दत्तवाड : शिक्षक भारती उर्दूच्या राज्य उपाध्यक्षपदी नावेद नाजिम पटेल यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र आमदार कपिल पाटील यांनी दिले. नावेद पटेल हे घोसरवाड (ता. शिरोळ) येथील उर्दू विद्या मंदिरच्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यावेळी राज्याध्यक्ष मुस्ताक पटेल, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, जालिंदर सरोदे, चंगेजखान पठाण, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नियाज पटेल, यासीन अन्सारी उपस्थित होते.
फोटो - ११०२२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - शिक्षक भारती उर्दूच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबाबतचे पत्र नावेद पटेल यांना देण्यात आले. यावेळी मुस्ताक पटेल, सुभाष मोरे, जालिंदर सरोदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
- गणेशवाडीत पेट्रोल चोरीच्या घटना
बुबनाळ : गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे रात्रीच्या वेळेस दुचाकीतून पेट्रोल चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या भुरट्या चोरांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पेट्रोलचे वाढलेले दर, त्यातच होणारी पेट्रोलची चोरी, त्यामुळे या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
- उदगावमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २० ते २५ फेब्रुवारीपर्यंत दिवसरात्र क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ३ हजार, २ हजार, १ हजार अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धा छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे होणार आहेत. तरी संघांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
उदगावात पथदिवे बसवा
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील ब्लड बँकेजवळ तसेच क्षय रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर पथदिवे बसविण्याची मागणी होत आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गावर क्षय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अजूनही पथदिवे नाहीत. तसेच रस्त्याचीही मोठी दुरवस्था झाली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन ब्लड बँक व क्षय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पथदिवे बसवून रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
---------------