इचलकरंजी : सरस्वती हायस्कूलमध्ये किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. पर्यवेक्षिका आर. एन. जाधव यांनी मुलींशी संवाद साधला. सहायक शिक्षिका अनुराधा काळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास एस. आर. भाटे, एस. एस. पाटील, एस. पी. पाटील, एस. एस. शिंदे, एम. ए. टिपुगडे उपस्थित होते.
लिंगायत वधू-वर मेळावा उत्साहात
इचलकरंजी : स्नेहबंध फौंडेशनच्यावतीने येथे राज्यस्तरीय लिंगायत पोटजातीसह वधू-वर पालक परिचय मेळावा घोरपडे नाट्यगृहात उत्साहात झाला. सुरुवातीला विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवगोंडा पाटील यांनी स्वागत केले. कार्यक्रमास अण्णासाहेब शहापुरे, सुधीर पाटील, उमेश पाटील, किशोर भुसारी यांच्यासह महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील वधू-वर पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय गुरव यांनी केले. सुनील चिंगळे यांनी आभार मानले.
पंच उजळणी शिबिर उत्साहात
इचलकरंजी : सरस्वती हायस्कूलमध्ये एकदिवसीय पंच उजळणी शिबिर उत्साहात पार पडले. शिबिराचे उद्घाटन अमरसिंह माने यांनी केले. राजन उरुणकर यांनी स्वागत व संभाजी बंडगर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पी. डी. शिंदे, संजय साळुंखे, संपत नलावडे, अर्जुन अतिग्रे आदी उपस्थित होते.