कोल्हापूर : महाराष्ट्राचा कृषी औद्योगिक विकास हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारामुळेच झाला असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांनी केले. हौसाबाई पोवार ट्रस्ट आणि राज प्रकाशन यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळा उभारणी कार्यातील शिलेदारांचा सत्कार केला, यावेळी ते बोलत होते. संभाजीराव पाटील, विजयसिंह पाटील, अशोक पोवार, रमेश मोरे यांचा सत्कार केला. ट्रस्टचे प्राचार्य डॉ. जे. के. पवार, पद्मजा पवार, राजवर्धन यादव आदी उपस्थित होते.
गौरव पणोरेकर यांची निवड
कोल्हापूर : बहुजन मुक्ती पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारीपदी गौरव पणोरेकर यांची निवड झाली. पक्षाचे महासचिव ॲड. राहुल मखरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
मातोश्री संस्थेकडून महिलांचा सत्कार
कोल्हापूर : गंगावेश येथील मातोश्री बहुउद्देशीय सोवाभावी संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविल्याबद्दल महिलांचा सत्कार करण्यात आला. वीरशैव बँकेच्या उपाध्यक्षा रंजना तवटे, शैक्षणिक क्षेत्रातील संजना भोसले नाईक, लता मेथे, वृषाली जाधव यांचा यामध्ये समावेश आहे. तेजस्विनी बिरंजे, मनीषा माने, विजया शिंदे, राजश्री जोशी, धनश्री बिरंजे आदी उपस्थित होते.
‘न्यू मॅडेल’मध्ये आत्मसंरक्षणाचे धडे
कोल्हापूर : महिला दिनानिमित्त न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेजमध्ये मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात आले. सिद्धी राजाध्यक्ष, साक्षी कवडे या कॉलेजमधील कराटेपटूंनी इतर मुलींना प्रशिक्षण दिले. प्राचार्या शुभांगी गावडे, प्रा. ए. एम. कोतवाल, ज्योती गडगे, प्रा. एस. आर. पाटील, प्रा. महेश कदम उपस्थित होते.