कोल्हापूर : राजारामपुरीतील नगररचनातील कर्मचारी निवडणूक कामात असल्याने बांधकाम परवानगीच्या फायली प्रलंबित आहेत. बांधकाम परवानगीची प्रक्रिया सुलभ करावी. नगररचना विभागात एकाच ठिकाणी असणारी बांधकाम परवानगी कार्यालयाचे काम चार विभागीय कार्यालयांतून करावे, अशी मागणी लोकराज्य जनता पार्टीच्यावतीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्याकडे केली. येथील सर्व्हेअर, ज्युनिअर इंजिनिअर व अन्य कर्मचारी स्टाफ वाढविण्यात यावा, निर्माण चौकातील मैदानावर महापालिकेची इमारत होणार असून येथील परिसरात संरक्षक भिंत बांधून परिसर अतिक्रमणापासून मुक्त करावा, अशी मागणी करण्यात आली.
विमाकर्मचारी सेनेची निदर्शने
कोल्हापूर : केंद्र शासनाकडून एलआयसीचा आयपीओ आणण्याच्या निर्णयाच्या विरोधात तसेच प्रलंबित वेतन कराराच्या मागणीसाठी भारतीय विमा कर्मचारी सेनेसह सर्व संघटनांनी गुरुवारी एक दिवसाचा संप पुकारला. केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी विजय लिंगनूरकर, संग्राम मोरे, संजय वडगावकर, निखिल कुलकर्णी, शिवाजी हंचनाळे, प्रथमेश पट्टणशेट्टी आदी उपस्थित होते.
प्रमोद शिंदे यांची निवड
कोल्हापूर : विश्व हिंदू परिषदेच्या कोल्हापूर शहर मंत्रीपदी प्रमोद आनंदराव शिंदे यांची निवड करण्यात आली. जिल्हा मंत्री विधीज्ज्ञ रणजितसिंह घाटगे यांनी त्यांची निवड केली असल्याचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसाद मुजुमदार यांनी जाहीर केले.
कॉमर्स विकमधून रोजगाराची संधी
कोल्हापूर : विद्यार्थ्यांना कौशल्य विकास करण्यासाठी व्यक्तिगत विकास घडवून कॉमर्स क्षेत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचे प्रतिपादन एलआयसीचे विकास अधिकारी सचिन पवार यांनी केले. करिअर करण्यासाठी ‘कॉमर्स वीक’मध्ये उत्साहाने सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात कॉमर्स वीकच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. ए. ए. कुलकर्णी होते. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी अभिजित पाटील यांनी विमा क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. सरिता पाटील, प्रा. ए. टी. रेडेकर यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. एम. एम. काझी, प्रा. एस. ए. तराळ, प्रा. व्ही. एस. सोणवणे, प्रा. एस. एस. शेटे उपस्थित होते.
आर्थिक संकटातून बाहेर पडणे सहकारामुळेच शक्य
पेठवडगाव : कोरोनासारख्या महामारीमुळे देशाच्या अर्थकारणाला मोठा फटका बसला असला तरी, सहकारी चळवळीच्या बळावरच सामाजिक विषमतेशी यशस्वी लढाई करता येईल, असा विश्वास अर्थशास्त्राच्या अभ्यासक प्रा. डॉ. रूपा शहा यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी शिक्षण संस्थेच्या संचालिका प्रा. प्रमिला माने यांच्याहस्ते डॉ. शहा यांना शाल, श्रीफळ देऊन समाजहितैषी रणरागिणी म्हणून गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जे. सी. घाटगे होते. रोहित चव्हाण, तुषार कांबळे आदी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. सुरेखा तवंदकर यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. ए. डी. अत्तार यांनी करून दिली. डॉ. प्रा. ए. डी. पोवार यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. जी. आय. सामंत यांनी केले.
फोटो : १९०३२०२१ कोल रुपा शहा न्यूज
ओळी :
पेठवडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले.