शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

संक्षिप्त वृत्त कोल्हापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:23 AM

बिंदू चौकातील नाईट कॉलेज ऑफ आर्टस‌् अँड कॉमर्सच्यावतीने सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक (सुगम संगीत व्होकल अभ्यासक्रम) हा सहा महिन्यांचा ...

बिंदू चौकातील नाईट कॉलेज ऑफ आर्टस‌् अँड कॉमर्सच्यावतीने सर्टिफिकेट कोर्स इन म्युझिक (सुगम संगीत व्होकल अभ्यासक्रम) हा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. १६ मार्च ते १६ सप्टेंबरदरम्यान, सायंकाळी ६ ते ७ असा कोर्सचा कालावधी असून, सातवी पास शैक्षणिक अर्हता आहे. १२ मार्चपर्यंत संपर्क साधवा, असे आवाहन नाईट कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्सचे प्र. प्राचार्य सुरेश फराकटे यांनी केले आहे.

स. म. लोहिया हायस्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात

कोल्हापूर : स. म. लोहिया हायस्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात झाला. मुख्याध्यापक एस. एस. चव्हाण, सुपरवायझर आर. आय. पवार, आर. जी. देशपांडे, विज्ञान विभागप्रमुख एस. एस. जांभळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विज्ञान शिक्षक आर. डी. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अयुष गोसावी यांनी केले. स्वराज मोरबाळे, श्रीहरी गोसावी, अथर्व पटेल, अभिषेक कंरजे, हर्षवर्धन पाटील, समर्थ पाटील, सोमेश कुंभार यांनी सहभाग घेतला.

कमला कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिन

ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्यावतीने विविध वाङ्मयीन उपक्रमांचे आयोजन केले होते. मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या वि. वा. शिरवाडकर नाट्य विशेषांकाचे तसेच क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालयाच्यावतीने ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्याहस्ते झाले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. वर्षा मौंदर्गी, डॉ. सुजय पाटील, उर्मिला कदम, प्रा. सुमती साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

डी. डी. शिंदे कॉलेजमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रम

कथाकथन, मराठी हस्ताक्षर स्पर्धा आणि ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयावरील व्याख्यान असे कार्यक्रम घेऊन डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. पी.आर. शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. सरस्वती एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा माधुरी शिंदे, प्रथमेश शिंदे प्रा. स्वाती तोरस्कर, दीक्षा पाटील आदी उपस्थित होते.

सौरभ पाटील यांची निवड

कोल्हापूर : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युवक कोल्हापूर शहर उपाध्यक्षपदी सौरभ संजय पाटील यांची निवड झाली. निवडीवेळी राहुल सोनटक्के, दावित भोरे, बापू पोवार, योगेश दावणे उपस्थित होते.

ना. पा. हायस्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात

रंकाळा वेश येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात झाला. मुख्याध्यापक एस. आर. गुरव, पर्यवेक्षक एस. डी. पुजारी, मराठी शाखेचे मुख्याध्यापक पी. जी. बामणे यांच्याहस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विज्ञान विभागाचे एस. ए. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष आर. ए. पाटणकर, पी. जी. गावडे, एन. एल. ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.

गझलेतून मानवीवृत्ती, भावना समजतात : प्रसाद कुलकर्णी

कोल्हापूर : गझलेला प्राचीन इतिहास असून, त्याला स्वत:चे आकृतीबंध आहेत. जो दुसऱ्यांचे दु:ख चांगल्याप्रकारे समजू शकतो, तोच लिहू शिकतो. गझलेतून मानवीवृत्ती, भावना समजतात, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी केले. मराठी भाषा दिनानिमित्त करवीरनगर वाचन मंदिर येथील गझल कार्यशाळेत ते बोलत हाेते. संस्कारभारती आणि करवीर नगर वाचन मंदिर यांनी याचे आयोजन केले होते. दुसऱ्या सत्रात श्रीराम पचिंद्रे यांनी गझल सहजसाध्य गोष्ट नाही. गझल लिहिणारा उत्तम कवी असतो, असे सांगितले. यावेळी अरुण सुणगार, नरहर कुलकर्णी, सारिका पाटील, डॉ. सुनंदा शेळके, डॉ. संजीवनी तोफखाने यांनी गझल सादर केल्या.