शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

‘काळम्मावाडी’तून पाणी आणू

By admin | Published: November 04, 2014 12:58 AM

हाळवणकर : ‘आयजीएम ’ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय

इचलकरंजी : काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणणारी योजना राबविण्याबरोबर आयजीएम रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय नगरपालिकेत झालेल्या विशेष बैठकीत घेण्यात आला.शहरात विविध नागरी सेवा-सुविधा पुरविण्याबरोबरच विकास-कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आमदार सुरेश हाळवणकर यांनी पालिकेच्या सभागृहामध्ये विशेष बैठक आयोजित केली होती. बैठकीसाठी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, मुख्याधिकारी सुनील पवार, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, कॉँग्रेसचे गटनेते बाळासाहेब कलागते, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव, बांधकाम सभापती महेश ठोके, आरोग्य सभापती चंद्रकांत शेळके, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील, जलअभियंता बापूसाहेब चौधरी, आदींसह नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीला आमदार हाळवणकर म्हणाले, मला लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता माझ्याकडून नगरपालिकेची व लोकांच्या हिताची शासन दरबारी असलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न मी करीत आहे. वैयक्तिक मान-सन्मान यात न पडता आपण जनतेच्या हिताची कामे करूया. म्हणूनच पुढाकार घेऊन मी या बैठकीचे आयोजन केले आहे.बैठकीत काळम्मावाडी धरणातून पाणी आणण्याच्या प्रस्तावाबाबत बोलताना हाळवणकर यांनी, राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाचा पाठपुरावा करून केंद्र व राज्य सरकारमार्फत शंभर टक्के अनुदानाने ही योजना पूर्ण करून घेण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर आयजीएम रुग्णालयाकडे असलेले ३५० खाटांचा दवाखाना पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा. तसेच शहरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.शहरातील नागरी सेवा-सुविधांची विविध कामे वेळेवर पूर्ण होण्यासाठी नागरिकांच्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. नगरविकासाच्या रेंगाळलेल्या प्रारुप विकास आराखड्यातील क्लिष्ट पद्धती सोपी करून नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचेसुद्धा या बैठकीत ठरविण्यात आले. शेवटी नगराध्यक्षा बिरंजे यांनी आभार मानून या बैठकीचा समारोप केला. (प्रतिनिधी)