वडूज : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेल्या स्वयंसेवकांनी सोमवार, दि. ३ रोजी सातारा येथे होणाऱ्या महामोर्चाची जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी गावोगावी नियोजन बैठकांचे आयोजनही केले जात आहे. दरम्यान, मोर्चादिनी पुसेगाव व कोरेगाव मार्गे साताऱ्यात येणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहता खटाव तालुक्यातील मराठा बांधव भल्या पहाटे साताऱ्याकडे येणार आहेत.येरळवाडी, बनपुरी, बोंबाळे, निमसोड, घोंडेवाडी, यलमरवाडी, मोराळे, मरडवाक, हिंगणे, डाळमोडी, सिद्धेश्वर कुरोली, लोणी, वरूड, भोसरे भुरकवडी, नागाचे कुमठे, उंबर्डे, वाकेश्वर, पेडगाव, गणेशवाडी आदी गावांसह मराठा महामोर्चात सहभागी होण्यासाठी नियोजनाच्या बैठकी सुरू आहेत. या महामोर्चात प्रचंड संख्येने सहभागी होण्यासाठी या परिसरातील तरुणाई जेवढी इच्छुक दिसून येत आहे. त्याच प्रमाणे महिला आणि आबालवृद्ध सुद्धा या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी उत्साही असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मराठा महामोर्चाच्या नियोजन बैठकी वेळी स्वयंसेवकांनी मांडलेले मुद्दे, आचासंहिता आणि हा महामोर्चा कशासाठी याची सविस्तर चर्चा प्रत्येक गावात प्रेरणादायी ठरत असल्याने संपूर्ण राज्याचे या महामोर्चाकडे लक्ष वेधून लागले आहे.महामोर्चा दरम्यान आचारसंहिता, शिस्त आणि महामोर्चावेळी बरोबर आलेला प्रत्येक व्यक्ती सुखरूप घरी जाईपर्यंत त्यांची घ्यावयाची काळजी या संर्दभात सविस्तर मार्गदर्शन होत असल्यामुळे सर्वच गावांत या महामोर्चाविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या परिसरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून हजारोंच्या संख्येने या महामोर्चात सक्रिय सहभाग नोंदविण्याचा मानस ही यावेळी व्यक्त करण्यात आला. गावागावांतील राजकीय गटतट बाजूला ठेवून मराठा समाज एकत्रित येत असल्याने हा महामोर्चा ‘न भूतो न भविष्यति’ असाच होणार असल्याचे जाणवत आहे. महामोर्चासाठी सामुदायिक रजा टाकून सह कुटुंब महामोर्चाला जाणार असल्याचे सूतोवाच केले जात आहेत. (प्रतिनिधी) तालुक्यातील १४१ गावांमध्ये जनजागृतीखटाव तालुक्यातील १४१ गावांमध्ये जनजागृती केली जात आहे. महामोर्चात कोरेगाव व पुसेगाव परिसरातील लाखो मराठा बांधव सहभागी होणार आहेत. त्यामुळे दि. ३ आॅक्टोबर रोजी या दोन्ही गावांमध्ये गर्दीसह वाहतुकीची कोंडी होणार आहे. ही कोंडी टाळण्यासाठी व महामोर्चात वेळेवर सहभागी होण्यासाठी खटाव तालुक्यातील मराठा बांधव भल्या पहाटे साताऱ्याकडे येणार आहेत.
खटावमधील बांधव भल्या पहाटे निघणार
By admin | Published: September 26, 2016 11:38 PM