शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

‘आजरा’च्या रणांगणात इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Published: April 28, 2016 11:25 PM

छाननीनंतर २२२ अर्ज : थांबवायचे कोणाला? नेत्यांपुढे बंडाचा पेच

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी छाननीनंतर २२२ उमेदवारांचे २६७ उमेदवार अर्ज राहिल्याने २१ जागांसाठी उमेदवार निवडीचा पेच गटनेत्यांसमोर असून उमेदवारी नाकारली तर ‘नाराज’ इच्छुक विरोधी आघाडीला रसद पुरविण्याचा धोकाही दिसत आहे.कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसची आघाडी व विरोधात अशोकअण्णा चराटी, विष्णूपंत केसरकर व मित्रपक्षांची आघाडी अशी थेट लढत होणार आहे. दोन्हीही आघाड्या नेटक्या होणार असल्याने दोन्ही आघाड्यांमधून इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. बेरजेच्या राजकारणात आजपर्यंत उमेदवारी निश्चित असणाऱ्यांपैकी अनेकांचे पत्ते ऐनवेळी कट होणार आहेत.दोन्ही आघाड्यांची बऱ्यापैकी पॅनेलरचना झाली आहे. राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीतून जयवंतराव शिंपी, अल्बर्ट डिसोझा, मुकुंदराव देसाई, उदय पवार, सुधीर देसाई, सदाशिव डेळेकर, श्रीमती अंजनाताई रेडेकर, बी. टी. जाधव, वसंतराव धुरे, संभाजी पाटील (हत्तीवडे), उमेश आपटे, अनिल फडके, विकास बागडी, आप्पासाहेब खेडेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, एम. के. देसाई यांची उमेदवारी निश्चित आहे.विरोधी आघाडीतून अशोकअण्णा चराटी, दिगंबर देसाई, विष्णूपंत केसरकर, नागोजी पाटील, सुनिता रेडेकर, नर्मदा सावेकर, दशरथ अमृते, बापूसाहेब सरदेसाई, विनायक देसाई, आनंदराव कुलकर्णी, मलिक बुरूड, राजू सावंत, संजय पाटील आदींची उमेदवारी निश्चित आहे.दोन आघाड्यांमध्ये दोन-चार जागांची निश्चिती होणे बाकी आहे. इच्छुकांची संख्या निश्चित झालेल्या उमेदवारी वगळता १८० च्या घरात आहे. दोन्ही पॅनेलमध्ये मिळून ७ ते ८ जागांकरिता १८० जण असल्याने नेतेमंडळींना पेचात टाकण्याचे काम इच्छुकांनी केले आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचा ४ मे रोजी मेळावाराष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीचा बुधवारी (४ मे) बाजार मैदान, आजरा येथे आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर येथील जनता बँकेत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकही पार पडली. मेळाव्याचे नेटके नियोजन करण्यात येत आहे.