शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृण खून, कारण अस्पष्ट; कोल्हापुरात उडाली खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:48 AM

मृतदेहाच्या पँटच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरून ओळख पटली

उद्धव गोडसे

कोल्हापूर: महानगरपालिकेच्या हद्दीतील जगतापनगर येथे जोतिर्लिंग शाळेजवळ एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना आज, गुरुवारी (दि. १९) सकाळी उघडकीस आली. ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (वय २५, रा. फुलेवाडी, पाचवा बसस्टॉप, कोल्हापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. करवीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अद्याप खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी काही शालेय मुले मैदानावर खेळत होती. खेळताना त्यांचा बॉल ओढ्याकडे गेला. त्यानंतर बॉल आणण्यासाठी गेलेल्या मुलांना एक मृतदेह आढळला. जवळच राहणा-या एका महिलेने शाळेकडे पळणा-या मुलांना विचारणा केल्यानंतर खुनाच्या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी करवीर पोलिसांना फोन करून खुनाची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेहाच्या पँटच्या खिशात मिळालेल्या आधार कार्डवरून त्याची ओळख पटवण्यात आली.ऋषिकेश याचा बुधवारी रात्री उशिरा जगतापनगरातील ओढ्यानजिक दोन ते तीन तरुणांशी वाद झाला असावा. झटापटीनंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड पडला होता. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गोरले यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

मित्रांकडूनच खून झाल्याचा संशयमृत ऋषिकेश सूर्यवंशी हा बुधवारी रात्री मित्रांसोबत जगतापनगर परिसरात जेवणासाठी गेला असावा. त्यावेळी काही कारणांवरून मित्रांमध्ये वाद होऊन त्याचा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असून, संशयिताचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस