कोल्हापूर : शिवाजी पुलानजीक वडणगे गावच्या हद्दीतील निर्जनस्थळी अंदाजे २२ वर्षांच्या युवतीचा अज्ञाताने धारदार सत्तुराने खून केल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. युवतीच्या मानेवर, पोटावर, हातावर अठरा वार केले आहेत. युवतीची ओळख, खून कोणी केला, कोणत्या कारणातून केला, हे अद्याप (पान १४ वर)स्पष्ट झालेले नाही. तिची ओळख पटल्यानंतर खुनाचे रहस्य उलगडणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शिवाजी पूल, पंचगंगा नदीघाटावर नेहमी अंघोळीसाठी नागरिकांची गर्दी असते. नेहमीप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते उदय निंबाळकर हे मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास अंघोळ करून नदीपलीकडे असलेल्या पाटील महाराज समाधिमंदिरात दर्शन घेण्यासाठी जात असताना त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेली युवती दिसून आली. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना या घटनेची वर्दी दिली. लक्ष्मीपुरी व करवीर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. युवतीच्या शरीरातून रक्तस्राव होत होता. त्यामुळे ती जिवंत असल्याची शक्यता व्यक्त करीत रुग्णवाहिका मागविली. त्यातून तिला सी.पी.आर. रुग्णालयामध्ये आणले असता ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन विभागात मृतदेहाची पाहणी केली असता तिच्या अंगावर एकूण अठरा गंभीर वार केल्याचे दिसून आले. पोलिसांना घटनास्थळी युवतीच्या मृतदेहापासून तीस फूट अंतरावर रक्ताने माखलेला सत्तूर मिळून आला. पाटील महाराज समाधिमंदिराच्या उजव्या बाजूला रिकामा माळ आहे. हा परिसर निर्जन आहे. सायंकाळी सहानंतर या परिसरात सन्नाटा पसरलेला असतो. मारेकरी हा युवतीला मोटारसायकलवरून घेऊन याठिकाणी आला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. खून हा पहाटे चारच्या सुमारास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मारेकऱ्याने हेच ठिकाण का निवडले, युवतीनेही त्याच्यासोबत अशा निर्जनस्थळी येण्याचे धाडस केले कसे, यापूर्वी मारेकरी याठिकाणी टेहळणी करून गेल्याची शक्यता आहे. अशा अनेक मुद्द्यांवर पोलिस तपास करीत आहेत. घटनास्थळावरील दृश्य पाहता युवतीवर अत्याचार झालेला दिसत नाही. मारेकऱ्याने तिच्यावर सत्तुराने हल्ला केल्यानंतर तिने त्याला हातांनी प्रतिकार केल्याने तिच्या हातावर जखमा दिसत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस उपअधीक्षक अमर जाधव, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथकाच्या श्वानाला युवतीच्या कपड्यांचा व सत्तुराचा वास दिला असता ते परिसरातचघुटमळले. (प्रतिनिधी) ते कार्ड शुक्रवार पेठेतील तरुणाचे युवतीच्या मृतदेहापासून काही अंतरावर एक फोटो कार्ड पोलिसांना मिळून आले. ते कार्ड पोलिसांना युवतीची ओळख व मारेकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचा मोठा पुरावा होता. त्या दृष्टीने तपास केला असता ते कार्ड ओमकार नागवेकर (रा. पिवळा वाडा, बुरुड गल्ली) याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता त्याने आपला कॅमेरा मित्र पीयूष ससे (रा. डांगे गल्ली, शुक्रवार पेठ) याला दिल्याचे सांगितले. त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने दि. १६ जून रोजी आपण त्याठिकाणी फोटो काढण्यासाठी गेलो होतो. यावेळी कॅमेऱ्यातील कार्ड बाहेर काढून ते खिशामध्ये ठेवत असताना पडले होते. दुसरे कार्ड टाकून फोटो काढल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीची पोलिस खातरजमा करीत आहेत. मृत युवतीचे छायाचित्र त्यांना दाखविले असता दोघांनीही तिला ओळखत नसल्याचे सांगितले. एजंटांची चौकशी युवतीची ओळख पटविण्याचा पोलिस दिवसभर आटोकाट प्रयत्न करीत होते. ती हायफाय कॉलगर्ल असण्याची शक्यता ओळखून शहरातील चार एजंटांकडे रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिस ठाण्यात चौकशी सुरू होती. पापाची तिकटी येथील काही आॅर्केस्ट्रॉच्या कार्यालयांतही पोलिसांनी चौकशी केली. त्या युवतीचा चेहरा व पोशाख बंगाली असल्याने पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. —————————————————————— फोटो : २१०६२०१६-कोल-खून ०१ कोल्हापूर येथील पंचगंगा शिवाजी पुलानजीक निर्जनस्थळी युवतीचा खून झालेल्या घटनास्थळाची मंगळवारी पाहणी करताना अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस उपअधीक्षक अमर जाधव, पोलिस निरीक्षक दिलीप जाधव. (छाया : नसीर अत्तार) ——————————————- फोटो : २१०६२०१६-कोल-खून ०२ मारेकऱ्याचा माग काढताना श्वानपथक. ——————————————- फोटो : २१०६२०१६-कोल-खून ०३ मारेकऱ्याने खून करण्यासाठी वापरलेला सत्तूर हॉटेल, लॉजची झाडाझडती मृत युवती व मारेकरी पहाटे शिवाजी पुलानजीकच्या निर्जनस्थळी आले आहेत. त्यामुळे ते रात्री हॉटेल-लॉजवर उतरले असण्याची शक्यता आहे. त्यानुसार शहरातील व शहराबाहेरील पन्हाळा रोडवरील हॉटेल-लॉजवर माहिती घेण्यासाठी एक पथक रवाना केले आहे. युवतीचे वर्णन मृत युवतीच्या अंगावर गुलाबी रंगाचा टॉप व निळ्या रंगाची लेगीन जीन्स आहे. टॉपवर रॉक-गर्ल लिहिले आहे. कानांत बनावट टॉप्स व हातात अंगठी आहे. ती रंगाने गोरी आहे. तिच्या कमरेला काळा दोरा व पायांत चप्पल आहे. पोलिस दोन्ही बाजूंनी तपास करीत आहेत. तिचे छायाचित्र व्हॉट्स अॅप, फेसबुकवरून सर्वत्र पाठविले आहे. शिवाजी पूल, व पन्हाळा रस्त्यांवरील काही सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. या रस्त्यावरून कदाचित युवती व मारेकरी मोटारसायकलवरून गेल्याचे फुटेज मिळेल.
युवतीचा निर्घृण खून
By admin | Published: June 22, 2016 12:58 AM