शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

ग्रामीण भागात ३०० चौरस फुटांपर्यंतचे बांधकाम करा बिनधास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 1:26 PM

building construction Kolhapur-ग्रामीण भागात ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना आता येथून पुढे कोणत्याही परवानगीची गरज राहणार नाही. नगर विकास खात्याने तशी अधिसूचना प्रसिद्धीस दिल्याने गेल्या दोन महिन्यांपासूनची प्रतीक्षाही संपली आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात ३०० चौरस फुटांपर्यंतचे बांधकाम करा बिनधास्तनगररचना विभागाची अधिसूचना जारी, ग्रामीण भागातील बांधकामांना येणार गती

कोल्हापूर : ग्रामीण भागात ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना आता येथून पुढे कोणत्याही परवानगीची गरज राहणार नाही. नगर विकास खात्याने तशी अधिसूचना प्रसिद्धीस दिल्याने गेल्या दोन महिन्यांपासूनची प्रतीक्षाही संपली आहे.ग्रामीण भागात बांधकाम करताना ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालय स्थरावर बांधकाम परवाना दिला जात होता. तथापि, या निर्णयामुळे खूप वेळ जात होता. बांधकाम रखडत होते, शिवाय बेकायदेशीर बांधकामेही वाढत होती. या सर्व अडचणींमुळे ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना कोणत्याही अटी, शर्तींशिवाय परवाना काढण्याच्या कटकटीतून सुटका करावी अशी मागणी होत होती.

याची दखल घेत डिसेंबरमध्ये नगर विकास विभागाने परवानगीची मर्यादा शिथिल केली होती. पण, त्याचे अंमलबजावणीचे आदेश काढले नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून गावपातळीवर मोठी संभ्रमावस्था होती.

बुधवारी याबाबत नगर विकास विभागाचे उपसचिव लहुराज माळी यांनी रत्नागिरी वगळता सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून १५० व ३०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना कोणत्याही परवानगीची गरज राहणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील बांधकामांना आता चांगले दिवस येणार आहेत. नागरी भागालगतच्या बांधकामांना याचा चांगला फायदा होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर