कोपार्डे : फसवणूक करून फरार झालेल्या बालिंगा (ता. करवीर) येथील अंबिका ज्वेलर्सचा मालक सतीश पोहाळकरला करवीर पोलिसांनी ज्वेलरी पेढीवर आणून झाडाझडती केली. किर्द, वह्या, नोंंदवह्या या पलीकडे काही सापडले नसल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणात फसवणूक झालेल्या ३५ गुंतवणूकदारांनी दोन कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद केला आहे. फरार सराफाला अटक करण्यात पोलिसांना तब्बल दोन महिन्यांनी यश आले. त्याला बालिंगा येथील अंबिका ज्वेलर्स या सुवर्णपेढीवर आणून पोलिसांनी झाडाझडती घेतली. पण पोलिसांच्या हाती फारसे काही सापडले नसल्याचे सांगण्यात येते.
चौकट
सराफ पोवाळकर याला पोलिसांनी बालिंगा येथे कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असलेल्या आंबिका ज्वेलर्स पेढीवर आणल्याचे समजताच अनेक गुंतवणूकदारांनी येथे आपल्याकडे असणाऱ्या दस्ताएवेजासह धाव घेतली पण याकडे कोणीही साधी चौकशी ही केली नाही. सराफ पोवाळकर याला पोलिसांनी बालिंगा येथे कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असलेल्या आंबिका ज्वेलर्स पेढीवर आणले व दुसऱ्यांदा पंचनामा केला.