केंद्र सरकारने दि. १६ जून २०२१ पासून केलेल्या हॉलमार्कचे सर्वच सराफ व सुवर्णकारांनी स्वागत केले. कारण त्यामुळे पारंपरिक वर्षानुवर्षे प्रत्येक पेढीशी जोडला गेलेल्या आमच्या ग्राहकाला योग्य वजनाचा दागिना तर मिळेलच, शिवाय आमचाही व्यवसाय वाढेल. मात्र, एचयूआयडी हॉलमार्कमधील काही क्लिष्ट तरतुदींना आमचा विरोध आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी लाक्षणिक बंद केला जाणार आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, कोकण, बेळगाव आणि गोवा येथील सराफ संघटनांच्या अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सराफ बाजार, व्यापार शंभर टक्के बंद ठेवून या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती भरत ओसवाल यांनी दिली. दरम्यान, या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार व्यापारी सहभागी होतील. सकाळी अकरा वाजता गुजरी येथे मूक निदर्शने करून जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले जाणार असल्याचे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी सांगितले.
चौकट
समस्या उभा राहणार
एचयूआयडीच्या प्रक्रियेसाठी आवश्यक त्या प्रमाणात हॉलमार्क सेंटरची उभारणी झालेली नाही. यापूर्वी दागिना हॉलमार्कसाठी दिला तर तो सहा तासांत परत मिळत होता. मात्र, एचयूआयडी प्रक्रियेत किमान सात ते आठ दिवसांनी एखादा दागिना आम्हाला परत मिळणार आहे. अशावेळी ग्राहकाला वेळेत दागिना देता येणार नाही. या तांत्रिक कारणाने बीएच दागिना हॉलमार्क झाला नसल्याचे शासकीय यंत्रणेस आढळल्यास संबंधित दुकानाचा परवाना रद्द करू शकतो. अशा समस्या इन्स्पेक्टर राजच्या माध्यमातून आमच्यासमोर उभा राहणार असल्याने ‘एचयूआयडी हॉलमार्क’ला आमचा विरोध असल्याचे भरत ओसवाल यांनी सांगितले.
फोटो (२२०८२०२१-कोल-भरत ओसवाल (सराफ संघ)
220821\22kol_3_22082021_5.jpg
फोटो (२२०८२०२१-कोल-भरत ओसवाल)