शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

कोल्हापुरात गुंडगिरी फोफावतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 1:08 AM

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सेंट्रिंग, मजुरीची कामे करीत असले तरी ते गल्लीत ‘दादा’-‘भाई’ म्हणूनच मिरवतात. दिवस-रात्र मद्यप्राशन करून किरकोळ कारणातून कोणी पण उठतो तो थेट भोसकतो. राजारामपुरी मातंग वसाहतीसह शहरातील १७ झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य वाढू लागले आहे. खून, खुनाचा प्रयत्न अशा घटनांनी या झोपडपट्ट्या हादरून गेल्या आहेत.दहा दिवसांपूर्वी ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सेंट्रिंग, मजुरीची कामे करीत असले तरी ते गल्लीत ‘दादा’-‘भाई’ म्हणूनच मिरवतात. दिवस-रात्र मद्यप्राशन करून किरकोळ कारणातून कोणी पण उठतो तो थेट भोसकतो. राजारामपुरी मातंग वसाहतीसह शहरातील १७ झोपडपट्ट्यांमध्ये गुन्हेगारीचे साम्राज्य वाढू लागले आहे. खून, खुनाचा प्रयत्न अशा घटनांनी या झोपडपट्ट्या हादरून गेल्या आहेत.दहा दिवसांपूर्वी राजारामपुरी मातंग वसाहत येथील पेंटर संदीप सखाराम बेरड (वय ३५, रा. राजारामपुरी, मातंग वसाहत) याचा खून वहिनीला का शिव्या देतोस, अशी विचारणा केल्याच्या रागातून झाला. तर पाणी अंगावर मारू नकोस अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून मलिक प्रभाकर भोसले (४२) याच्यावर खुनी हल्ला केला. या दोन्ही घटना पोलिसांना विचार करायला लावणाऱ्या आहेत.‘भाईगिरी’च्या जोरावर दमदाटी करून पैसे उकळणे, चोºया, घरफोडी करण्यामध्ये येथील तरुण आघाडीवर आहेत. पैशांसाठी वाट्टेल ते करणारे येथील ‘दादा’-‘भाई’ राजकीय नेते व सावकारांच्या दावणीला बांधले आहेत. निवडणूक असो किंवा व्यवसायातील वसुली, त्यासाठी या गुन्हेगारांचा वापर केला जातो. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, चोºया, हाणामारीसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले गुन्हेगारांचे वास्तव्य या झोपडपट्ट्यांमधूनच आहे.राजारामपुरी मातंग वसाहत, राजेंद्रनगर, जवाहरनगर, सुभाषनगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, शाहूनगर, दौलतनगर, यादवनगर, कनाननगर, सदर बाजार, शिवाजी पार्क, सुधाकर जोशी नगर, गंजीमाळ, बिडी कामगार चाळ, वारे वसाहत, आदी झोपडपट्ट्या पोलीस रेकॉर्डवर आहेत. येथील नवीन गुन्हेगार पुढे येऊ लागले आहेत. गल्लीतून जाताना एकमेकांकडे पाहणे देखील जिवावर बेतले जात आहे. कोणाला भांडू नको, असा सल्ला देणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण दिल्यासारखी भयावह परिस्थिती या झोपडपट्ट्यांमध्ये दिसते. कोणीही उठतो तो थेट तलवार, चाकू, सत्तूर बाहेर काढतो. त्यांना रोखण्याचे धाडस कोणीच करू शकत नाही. झोपडपट्ट्यांतील मजूर लोक सेंट्रिंग, मोलमजुरी, भंगार गोळा करण्याचे काम करतात. घरातून संस्कार न मिळाल्याने बहुतांश तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. गल्ली-बोळात चेष्टा-मस्करी करताना त्यातून होणारी हाणामारी, त्यातून सुडाची भावना या संघर्षातून कोणाचातरी बळी जातो. गुन्हा दाखल करून आरोपींना अटक होते. तीन महिन्यांनी हेच आरोपी पुन्हा झोपडपट्टीमध्ये बिनधास्त वावरतात. वाढत्या गुन्हेगारीची दखल घेत पोलिसांनी येथील लोकांचे प्रबोधन करणे अपेक्षित आहे.गुन्हेगारच खबरेगुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार पोलिसांचे खबरे आहेत. बहुतांशी झोपडपट्टीतील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार खबरे आहेत. पोलिसांच्या समोर ऊठबस असल्याने त्यांची दादागिरी वाढत आहे. पोलीसही त्यांनी केलेल्या गुन्ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.