शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यातील बारावीची परीक्षा मे महिन्यात, तर दहावीची जूनमध्ये घेण्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. पूर्व नियोजनानुसार या परीक्षेच्या कोऱ्या उत्तरपत्रिका आणि अन्य साहित्य केंद्रांवर पोहोचविण्यात आले आहे. मात्र, परीक्षा पुढे गेल्याने कोल्हापूर विभागातील एकूण ३,४११ केंद्र असलेल्या शाळा प्रशासन आणि तेथील मुख्याध्यापकांना या कोऱ्या उत्तरपत्रिका आणि अन्य साहित्य सांभाळण्याची कसरत करावी लागत आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिल ते दि. २१ मे दरम्यान, तर दहावीची परीक्षा दि. २९ एप्रिल ते दि. २० मे या कालावधीत होणार होती. या परीक्षांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण २,५९,६२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आणि नियोजित वेळापत्रकानुसार होतील असे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शिक्षण विभागाकडून सांगण्यात येत होते. त्यानुसार या विभागाच्या सूचनेनुसार विभागीय मंडळांनी केंद्रांवर साहित्य पोहोचविले. दरवर्षी केवळ महिनाभर या कोऱ्या उत्तरपत्रिका, इतर साहित्य या केंद्र असलेल्या शाळांना सांभाळावे लागत होते. मात्र, यंदा हे साहित्य दीड ते दोन महिने सांभाळावे लागणार असल्याचे दिसते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमुळे बहुतांश शाळा बंद आहेत. शिक्षक, कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित नाहीत. त्यामुळे या उत्तरपत्रिका, साहित्य सांभाळण्याचे धोका आहे. त्यामुळे एक प्रकार या साहित्याचा शाळांवर बोजा पडला असून मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला आहे.

चौकट

हे साहित्य कस्टडीत

कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅॅप, होलोक्रॉप्ट, स्टीकर, सिटिंग प्लॅॅन, विषय आणि माध्यम निहाय बारकोड, प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य.

चौकट

परीक्षा कधी? पुढील प्रवेश कधी?

गेल्या वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षेच्या वेळेत झाल्या होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या परीक्षेचे निकाल जुलैमध्ये जाहीर झाले. त्यामुळे अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया लांबली. यंदाही कोरोना वाढू लागल्याने परीक्षा आणि पुढील प्रवेश परीक्षा कधी होणार हा प्रश्नच आहे.

===Photopath===

200421\20kol_1_20042021_5.jpg

===Caption===

२००४२०२१-कोल-ब्लँक ॲॅन्सरशीट डमी)