शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

शालेय दप्तराचे ओझे कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:27 AM

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : वेळापत्रकात बदल, सर्व विषयांसाठी अथवा दोन विषयांसाठी एक वही, ई-लर्निंगच्या माध्यमातून ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वेळापत्रकात बदल, सर्व विषयांसाठी अथवा दोन विषयांसाठी एक वही, ई-लर्निंगच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील १८० शाळांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी केले आहे. गेल्या सात वर्षांपासून शाळांनी या विविध संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे.इयत्ता पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना कोणताही गृहपाठ दिला जाऊ नये. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त असू नये, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने कोल्हापूर शहरातील याबाबतची स्थिती जाणून घेतली. दप्तराचे वाढते ओझे ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मोठी समस्या आहे. ती सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनांनुसार शहरातील शाळांनी विविध संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. विद्यापीठ मराठी शाखा शाळेने वेळापत्रकात बदल, दोन विषयांसाठी एक वही, वर्ग कोपरा आणि ई-लर्निंगच्या माध्यमातून दप्तराचे ओझे घटविले आहे. दर शनिवारी ‘विनादप्तर शाळा’ भरविण्यात येते. त्या दिवशी ज्ञानरचनावादी शिक्षण दिले जाते. शाळेने विद्यार्थ्यांच्या वजनाच्या तुलनेत दप्तराचे वजन दहा टक्के ठेवले आहे. कदमवाडी येथील महानगरपालिकेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिरात गतवर्षीच्या शैक्षणिक वर्षातील पुस्तके जमा करून घेऊन ती वर्ग अभ्यासासाठी बेंचीसमध्ये कायमस्वरूपी वर्गातच ठेवण्यात आली आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील नवीन पुस्तके घरी अभ्यासासाठी वापरण्यास दिली आहेत. त्यामुळे ५० टक्के ओझे कमी झाले आहे.शाहूपुरीतील वसंतराव चौगुले विद्यालयात सर्व विषयांसाठी एकच वही वापरण्याची संकल्पना राबविली जाते. या शाळांची ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. शहरातील महानगरपालिका, खासगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा १८० शाळांनी दप्तराचे ओझे कमी केले आहे.