ठळक मुद्देबोंद्रेनगर येथे घरफोडीएक लाख किंमतीचा ऐवज लंपास
कोल्हापूर : रिंगरोड बोंद्रेनगर येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी रविवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.अधिक माहिती अशी, विलास सदाशिव भालेकर (वय ५३) हे १८ जानेवारीला कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते. यावेळी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडून बेडरुममधील तिजोरी उघडून साहित्य विस्कटले होते.
त्यातील सोन्याच्या रिंगा, कर्णफुले, चांदीच्या वस्तु, लॅपटॉप, अडीच हजार रोकड असा सुमारे लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पोलीस निरीक्षक सुनिल पाटील तपास करीत आहेत.