कोल्हापूर : अष्टविनायक पार्क, मोरेवाडी (ता. करवीर) येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २५ जानेवारीच्या मध्यरात्री घडली.याबाबत पोलिसांनी सांगितले, रणजित बाबूराव पाटील (वय ३१) हे २५ जानेवारीला कुटुंबियांसह आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) गावी चुलत्यांची तब्येत बरी नसल्याने पाहण्यासाठी गेले होते.
चोरट्याने बंद घर हेरून त्याच रात्री फोडले. त्यामध्ये सात हजार रुपये, सोन्याच्या अंगठ्या, कानातील जोड, चांदीचे नाणी, असा ऐवज लंपास केला. या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.शेडमधील साहित्याची चोरीराजारामपुरी, सीटीसर्व्हे जनता बझार चौक येथील नवीन कॉम्पलेक्स उभारण्यासाठी आणलेले साहित्य चोरट्याने लंपास केल्याचे रविवारी उघडकीस आले.
याबाबत पोलिसांनी सांगितले, रवींद्र बहिर्जी मोरे (वय ५१, रा. टाकाळा) हे पुणे येथील महेश सोमानी यांचे राजारामपुरीत सिटी सर्व्हे जनता बझार येथे नवीन कॉम्पलेक्सचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी उभारलेल्या पत्र्याचे शेडमध्ये साहित्य ठेवले होते.
चोरट्याने शनिवारी मध्यरात्री शेडचे कुलूप तोडून अॅल्युमिनिअमचे चाळीस पाईप असा सुमारे २१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत मोरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.