याबद्दल अधिक माहिती अशी की, शहरातील राजीव नगरमध्ये बंद असलेल्या घरांना टार्गेट करून घरफोडी सत्र सुरू आहे. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास परगावी गेलेल्या शिवानंद पंडित बिरादार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सुमारे 8 तोळ्याचे दागिने व इतर साहित्य लंपास केले आहे. शनिवारी पहाटे देखील याचभागातील करेपगोळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. पण घरातील सुमारे 17 तोळे सोने एका कापडात बांधून अन्य ठिकाणी ठेवले होते. त्यामुळे तिजोरी फोडलेल्या चोरट्यांना रिकाम्या हाताने जावावे लागले. त्यानंतर पुन्हा आज बिरादार यांच्या घरात चोरीची घटना घडल्याने राजीव नगरात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजीव नगर भागात शिक्षक व नोकरदार लोक राहत असून सुटीच्या दिवशी बाहेर गावी गेल्याच फायदा घेऊन चोरी करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. यामागे एखादी टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे. यांच्या मुसक्या अवळण्याची गरज आहे.
चिकोडीत घरफोडीचे सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:29 AM