शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

‘जलाओ ऐसी शमा, के रोशनी औरों के काम आये

By admin | Published: July 22, 2014 11:38 PM

कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी : पै-पै साठवून १२३ कुटुंबीयांच्या जीवनात प्रकाश’

एम. ए. पठाण ल्ल कोल्हापूर‘जिओ इस तरह की, जिंदगी औरों के काम आये। जलाओ ऐसी शमा के, रोशनी औरों के काम आये’ अशा विचारातून समाजातील गोरगरीब, विधवा, अनाथ व गरजू लोकांच्या जीवनात जगण्याची उमेद निर्माण करण्याचे काम कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी करीत आहे. गतवर्षी या कमिटीने प्रथमच सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा केले. अन् गरजंूना सात लाख सहा हजार ७२७ रुपये खर्च करण्यात आले. १२३ गरजूंंना याचा लाभ झाला.मुस्लिम बांधव रमजान महिन्यात आपली जकात, फितरा गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतात. यासाठी समाजातील काही व्यक्ती, समूह कार्यरत आहेत. उलमा-ए-करात यांच्या मार्गदर्शनानुसार समाजातील लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे, हा उद्देश घेऊन काही तरुण नि:स्वार्थीपणे एकत्र आले आणि त्यातून गतवर्षी कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी अस्तित्वात आली. मुस्लिम समाजातील बांधवांकडून दिलेली जकात, फितरा, सदका, आदी दिल्यानंतर ती गरजूंच्या हाती पडेल. त्याचा चांगला विनियोग होईल. त्याची दुआ मिळेल, हा उद्देश असतो. या उद्देशाला या विचाराने एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या कमिटीच्या माध्यमातून होत आहे.गरीब, विधवांच्या घरी प्रत्येक महिन्याला काही ठराविक धान्य पोहोचविण्याचे काम होत आहे. अनाथ मुलीच्या लग्नातील खर्च, जे गरीब रुग्णालयात उपचार घेत आहेत त्याचा औषधोपचारांचा खर्च, शस्त्रक्रियांचा खर्च, आदी मदत करण्याचे काम कमिटी करत आहे.कमिटीकडे गतवर्षी एकूण सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा झाले होते. यामध्ये जकात ३ लाख ५५ हजार ७२१ रुपये, इमदाद १ लाख ४८ हजार १७३ रुपये, सदका १ लाख ८६ हजार २३९ रुपये, फितरा २०० रुपये, फिदिया ३५०० रुपये, कफ्फारा १ लाख ५०० रुपये, बकरी ईदच्या बकऱ्यांच्या चमड्यांपासून १९ हजार ६३० रुपये, इतर ४,३७२ रुपये असे एकूण सात लाख १९ हजार ३३५ रुपये जमा झाले होते. समाजबांधवांनी गतवर्षी या कमिटीवर विश्वास दाखवत आपली जकात, फितरा, सदका, आदी जमा केला. हे समाजातील अनाथ मुले, विधवा, गरजू आई-वडिलांच्या वाईटवेळी उपयोगी पडले. त्यामुळे त्यांच्याकडून मिळणारी दुआ ही लाख मोलाची ठरणार आहे. समाजातील अशा अनेक प्रसंगातील गरजंूना मदत करण्यासाठी याहीवर्षी कमिटी निरपेक्ष, नि:स्वार्थी भावनेने जोमाने कामास लागली आहे. मुस्लिम बांधवांनी आपली जकात या कमिटीकडे अधिक जमा करण्याची गरज आहे. जेणेकरून समाजातील अधिक गरजवंतांना याचा लाभ होईल.कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीचे सदस्य याही वर्षी जोमाने कार्यरत असून यावर्षी सर्वसाधारण १५ लाखाहून अधिक रक्कम जमा होईल असा विश्वास कमिटीच्या सदस्यांनी व्यक्त केला.