शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

शिवसेनेकडून कर्नाटकचे मंत्री रोशन बेगच्या प्रतिमेचे दहन

By admin | Published: May 25, 2017 2:37 PM

मराठी माणसांवरील कुरघोडी थांबवा, अन्यथा कन्नडिगांची पळताभुई थोडी होईल : क्षीरसागर

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २५ : कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेगच्या वक्तव्याचा निषेध करीत शिवसेनेतर्फे कोल्हापूरात छत्रपती शिवाजी चौकात बेगच्या पुतळ्याचे गुरुवारी दहन करण्यात आले.

कर्नाटकचे नगरविकास मंत्री बेग यांनी कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्रचा नारा दिल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यामुळे सीमाभागात संतापाची लाट पसरली असून शिवसेनेने त्याचा निषेध केला आहे. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले. त्यांनी यावेळी जय भवानी, जय शिवाजी, अभिमानाची गोष्ट, जय महाराष्ट्र, रोशन बेगचे करायचे काय, खाली डोकं वर पाय, कर्नाटक शासनाचा धिक्कार असो, यासह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी छत्रपती शिवाजी चौक परिसर दणाणून सोडला.

यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाषण केले. ते म्हणाले, जय महाराष्ट्र हे घोषवाक्य महाराष्ट्राची शान आणि मराठी माणसांच्या अस्मितेचे ब्रीद आहे. त्यामुळे कर्नाटक काय जगभराच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मराठी माणसाला जय महाराष्ट्र म्हणण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कानडी सरकारकडून सीमा बांधवावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करु नये, मराठी माणसांचा अंत पाहू नका, अन्यथा कन्नडिगांची पळताभुई थोडी होईल, असा इशारा गुरुवारी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला.

यावेळी शिवसेनेचे दीपक गौड, संजय गांधी समितीचे अध्यक्ष किशोर घाटगे, जयवंत हारुगले, रणजित जाधव, विशाल देवकुळे, सुनील जाधव, दीपक चव्हाण, अमित चव्हाण, तुकाराम साळोखे, अजित गायकवाड, सुनील खोत, रमेश खाडे, विजय देसाई, युवा सेनेचे शहरप्रमुख चेतन शिंदे, पियुष चव्हाण, अविनाश कामते, माथाडी कामगार सेनेचे शहरप्रमुख राजू जाधव, गजानन भुर्के, शाम जाधव, सुनील भोसले, अश्विन शेळके, सागर घोरपडे, सुनील करंबे, राजू काझी, विनय वाणी, सचिन भोळे, कपिल सरनाईक, ओमकार परमणे, उदय भोसले, शिवाजी सावंत, महादेव पोवार, किरण पाटील, हर्षल पाटील, गजानन तोडकर, दिनेश साळोखे, सौरभ कुलकर्णी, यशवंत पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.