नांदगाव : डॉ. अनिल नेरू रकर पुरस्कृत वसुंधरा तंबाखूमुक्ती अभियान, उपकेंद्र तळेरे आयोजित तीन तालुकास्तरीय गड-किल्ले स्पर्धेत देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथील जाणता राजा गटाने बनविलेल्या रामगडच्या प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला तर वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील शिव कलासंगम गटाने बनविलेल्या सुवर्णदुर्गाच्या प्रतिकृतीने द्वितीय क्रमांक पटकावला. मुलांना आपल्या ऐतिहासिक वास्तूविषयी आवड निर्माण व्हावी. तसेच सध्या समाजात भेडसावणाऱ्या व्यसनाधिनता या समस्येबद्दल जाणीव जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रा. एस. एन. पाटील (वैभववाडी महाविद्यालय) ए. ए. मुद्राळे, डी. जे. मारकड (कासार्डे विद्यालय) यांनी काम पाहिले.या स्पर्धेच्या परीक्षणादरम्यान उपस्थित असलेल्या या गावातील जनसमुदायाला वसुंधरा तंबाखू प्रतिबंध अभियानचे प्रकल्प सहायक श्रावणी मदभावे व सतीश मदभावे यांंनी तंबाखू व्यसनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती दिली. तीन तालुकास्तरीय आयोजित स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : रामगड-जाणता राजा गट, बुरंबावडे-प्रथम, सुवर्णदुर्ग-शिवकलासंगम गट, नाधवडे-द्वितीय. जंजिरा गर्जतो मराठा गट, तळेरे-तृतीय. उत्तेजनार्थ अर्नाळा- महाराजा गट-तळेरे, प्रतापगड- शिवाजी गट-गवाणे, पन्हाळा द ग्रेट मराठा गट -धुमाळवाडी कासार्डे यांनी पटकाविला. विजेत्या स्पर्धक गटांचे व त्यांच्या पालकांचे डॉ. नेरूरकर, बी. सी. नाईक, प्रदीप बर्डे, केदारी पठाडे, इतर संस्था पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. बक्षीस वितरण समारंभ फोनद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती श्रावणी मदभावे यांनी दिली. (वार्ताहर)व्यसनमुक्तीचे सादरीकरणया स्पर्धेत कणकवली, वैभववाडी व देवगड तालुक्यांतून सिंधुदुर्ग - राजे गट - नाधवडे, सिंहगड - पंचरंगी गट -पियाळी, शिवनेरी - वीर शिवाजी गट-साळीस्ते, वसईचा किल्ला - सुवर्ण गट, साळिस्ते, पन्हाळगड - शिवा गट -गवाणे यांनी स्पर्धेत भाग घेऊन किल्ल्यांचे व व्यसनमुक्तीचे सादरीकरण केले. या स्पर्धेदरम्यान सर्वच ठिकाणी अनेक पालकांनी तंबाखूमुक्तीच्या जाणीव-जागृतीच्या मोहिमेचे कौतुक करीत अभियानात सहभागी होण्याचे अभिवचन दिले. तर काहींनी स्वत:चे गाव तंबाखूमुक्त करण्याचे आश्वासन दिले.
बुरंबावडेचा रामगड प्रथम
By admin | Published: December 25, 2015 9:58 PM