जिलह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, ठिकठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस पुराच्या पाण्यात अडकल्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी पहाटे कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरून रत्नागिरीला कर्नाटकराज्य परिवहनची बस निघाली होती. यात २२ नागरिक होते, मार्गावर पाणी आलेले असतानाही चालकाने बस पुढे नेली; मात्र गाडी पाण्यात मध्यभागी गेल्यानंतर पाण्याचा वेग वाढला आणि खोली पाहून वाहनचालक घाबरला. त्याने गाडी अडकल्याचा संदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिला. ही माहिती मिळताच पथकाचे जवान आंबेवाडी येथे पोहोचले. दोन जवान पाण्यातून मार्ग काढत बसपर्यंत पोहोचले. सिद्धार्थ पाटील व शुभम काटकर या जवानांनी सर्वांना धीर दिला. पाठीमागून पथक प्रमुख सुनील कांबळे सोबत अजित शिंदे, रोहित कांबळे, सोमनाथ लोहार, शिवा गडकरी हे बोट घेऊन रवाना झाले. दरम्यान, पाणी बसमध्ये शिरले होते. बोट पोहोचताच सर्व प्रवाश्यांना त्यातून सुखरुप बाहेर काढण्यात आले. नंतर पाणी वाढल्याने ही बस वाहून गेली.
यासह जिल्ह्यातील मौजे पांगिरे, ता.भुदरगड येथून नाशिकला निघालेली प्रवासी वाहतूक करणारी ट्रॅव्हलर येथील पुलावर अडकली होती. यात ११ नागरिक होते. त्या सर्वांनादेखील सुखरुप बाहेर काढण्यात आले.
---
फोटो कोलडेस्कला रजपूतवाडी बस प्रवासी फोटो
ओळ : रजपूतवाडी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील २५ प्रवाश्यांना आपत्ती व्यवस्थापनच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले.
---