कोल्हापूर : नियमानुसार स्क्रॅप केलेल्या रिक्षाला रत्नागिरीतील रिक्षाचा नंबर प्लेट लावून त्याद्वारे कोल्हापूर शहरात रिक्षा व्यवसाय करणाऱ्यास शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला. राहुल शामसिंग तिवारी (वय ३९, रा. शिंगणापूर, कमानीजवळ, कोल्हापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रत्नागिरी शहरातील फैजाज दिलावर शेख (मु. पो. शिरगाव, उर्दु शाळेनजीक, मयेकरवाडी, रत्नागिरी) यांच्या मालकीची रिक्षा त्यांनी २०१० मध्ये घेतल्यापासून रत्नागिरी शहरात चालवत आहेत. ते रिक्षा रत्नागिरी आर.टी.ओ. कार्यालय येथे पासिंग करण्यासाठी गेले, त्यावेळी त्यांच्या रिक्षावर दि. २० एप्रिल २०१९ रोजी कोल्हापुरातील शिंगणापूर येथील राहुल तिवारी नामक चालकावर लायसन बॅच व कागदपत्रे नसल्याच्या कारणांवरून कारवाई केली आहे हे निदर्शनास आले. तो त्याच रिक्षाचा नंबर वापरून स्क्रॅप केलेल्या रिक्षाद्वारे व्यवसाय करत असल्याची माहिती पुढे आली. शेख यांनी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि वाहतूक नियंत्रण शाखेशी संपर्क साधला. त्यामुळे शहर वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मधुकर चौगुले आणि पो. कॉ. सचिन जांभळे, प्रसाद कारेकर, कॉ. पोरे आदींनी तपास करून शिंगणापूर येथील राहुल तिवारी यांच्याकडील रिक्षा जप्त केली. रत्नागिरीतून फय्याज शेख यांना सोमवारी बोलावून घेतले. त्यांनी तिवारीविरोधात जुना राजवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवला.
फोटो नं. २८०६२०२१-कोल-ॲटो
ओळ : शहर वाहतूक नियंत्रण शाखेने रिक्षा जप्त केली व संशयित राहुल तिवारी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले.
===Photopath===
280621\28kol_1_28062021_5.jpg
===Caption===
ओळ : शहर वाहतुक नियंत्रण शाखेने रिक्षा जप्त केली व संशयीत राहूल तिवारी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याला ताब्यता घेतले.