कोल्हापूर : निधन, राजीनामा, अपात्रता अशा विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ६० ग्रामपंचायतींमधील ६६ सदस्य व ६ सरपंच पदासाठी दि. १८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी हा कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे. मतमोजणी दि. १९ मे रोजी होणार आहे.राज्यातील २ हजार ६२० ग्रामपंचायतींमधील ३ हजार ६६६ सदस्य व १२६ सरपंचपद रिक्त आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील १२ तालुक्यांमधील एकूण ७२ जागांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १८ जागा या चंदगडमधील १० ग्रामपंचायतींची आहे. या रिक्तपदांसाठी १८ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी दि. ९ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम असानिवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : १८ एप्रिलउमेदवारी अर्ज सादर करणे : २५ एप्रिल ते २ मेअर्जाची छाननी : ३ मेमाघार व अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध करणे : ८ मेमतदान : १८ मेमतमोजणी : १९ मेअधिसूचना प्रसिद्धी : २४ मे