शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

गटातटाच्या भक्कम तटबंदीचा ‘कागल’

By admin | Published: September 16, 2014 12:00 AM

जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ : दिग्गज नेत्यांची पिढी राज्याच्या राजकारणात

जहाँगीर शेख - कागल -कोल्हापूर संस्थानाबरोबरच कागलची जहागिरीही भारतात विलीन झाल्यानंतर १९५० मध्ये ८० गावांचा कागल तालुका अस्तित्वात आला. १९९२ पासून कागल विधानसभा मतदारसंघ सुरू झाला. २००९ पर्यंत यात बदल नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ ऐवजी १० मतदारसंघ पुनर्रचित करण्याच्या प्रक्रियेत कागल मतदारसंघाला गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज शहर, कडगांव, कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आजरा तालुक्यातील उत्तूर जि. प. मतदारसंघ जोडून हा नवा कागल विधानसभा मतदारसंघ बनविण्यात आला. पुनर्रचित नव्या मतदारसंघानंतरची ही आता दुसरी विधानसभा निवडणूक होत आहे.गटा-तटाच्या भक्कम तटबंदीचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी बिरुदावली मिळविलेल्या या मतदारसंघाने दिग्गज नेत्यांची पिढी राज्याच्या राजकारणाला दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय उलाढालीने जिल्ह्याच्या राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकीय भूगोलात बदल घडवून दाखविले आहेत. १९५२ मध्ये पहिले आमदार शिक्षणमहर्षी एम. आर. देसाई (कोल्हापूर) अपक्ष म्हणून, तर १९५७ ला पहिल्या महिला आमदार विमलाताई कागल एकीकरण समितीकडून, तर १९६२ ला राज्याच्या राजकारणात ‘तरुण तुर्क’ म्हणून प्रसिद्ध झालेले शामराव भिवाजी पाटील (मौ. सांगाव) हे आणि १९६७ला स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांच्यारूपाने चौथा आमदार लाभला. मात्र, खऱ्या अर्थाने कागलचा राजकीय भूगोल बदलला तो १९७२ नंतर सदाशिवराव मंडलिक हे आमदार झाले. विक्रमसिंह घाटगेंचा राजकीय उदय झाला. १९७८ मध्ये घाटगे आमदार झाले. १९८० मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले, तर १९८५ची विधानसभा ही प्रचंड राजकीय ईर्ष्येतून लढविली जाऊन अवघ्या २६१ मतांनी मंडलिकांनी घाटगेंचा पराभव केला. यानंतरच्या काळात हसन मुश्रीफ यांचा बोलबाला झाला. प्रत्युत्तरादाखल संजय घाटगेंनाही ‘राजकीय ट्रॅक’ मिळाला. १९९५ पर्यंत मंडलिकांनी आमदारकी भूषविली. १९९८ला मंडलिक खासदार झाल्यामुळे पोटनिवडणुकीत संजय घाटगेंनी मुश्रीफांचा पराभव केला; मात्र १९९९ला राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना मुश्रीफांच्या पथ्यावर पडली. त्यांनी संजय घाटगे (कॉँग्रेस)चा पराभव केला. त्यानंतर १५ वर्षे ते आमदार, तर १४ वर्षे मंत्री आहेत. संजय मंडलिकांनीही २००९ची आमदारकी अजमावली. या मतदारसंघावर कॉँग्रेस, राष्ट्रवादी, एस कॉँग्रेस अशा कॉँग्रेशी विचारांचाच प्रभाव दीर्घकाळ राहिला. अपक्ष, शिवसेना, एकीकरण समिती यांनाही येथे संधी मिळालेली आहे.घाटगे-मंडलिकांचा प्रभावया मतदारसंघावर सर्वाधिक प्रभाव विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक या दोन नेत्यांचाच राहिला आहे. मंडलिक चारवेळा, तर घाटगे दोनवेळा आमदार झाले आहेत. या दोघांपासून राजकीय कारकीर्द प्रारंभ करणारे हसन मुश्रीफ यांनी तीनवेळा, तर संजय घाटगेंनी एक वर्षाची आमदारकी भूषविली आहे. यापैकी मंडलिक-मुश्रीफ या दोघांनी जिल्ह्याच्या राजकारणावरही ‘कमांड’ ठेवली आहे.५