शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
3
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
4
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
5
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
6
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
7
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
8
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
9
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
10
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
11
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
12
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
13
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
15
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
16
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
17
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
18
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
19
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
20
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार

रस्त्यावर तलवारीने कापला केक : आरसी गँगच्या चौदाजणांवर गुन्हा-दहशत माजविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 5:50 PM

दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरसी गँगच्या चौदाजणांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कर्जदाराने थकीत कर्ज भरण्यासाठी दिलेल्या नऊ लाख रुपये रकमेचा गैरवापर करून त्यातील एक लाख ६३ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शुक्रवार पेठ, तेली गल्ली येथील श्री बसवेश्वर को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या

ठळक मुद्देबसवेश्वर सोसायटीमध्ये पावणेदोन लाखांचा अपहार

कोल्हापूर : सुभाषनगर हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरसी गँगच्या चौदाजणांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ३१ मार्चला रात्री हा प्रकार घडला.संशयित रवी सुरेश शिंदे, केदार सातपुते, गणेश पंडित बामणे, प्रकाश कांबळे, संदीप गायकवाड, योगेश पाटील, जावेद सय्यद, साई संभाजी कांबळे, शुभम दीपक मुळीक, अमित अंकुश बामणे, सनी राम साळे, सागर प्रभुदास व्हटकर, रणजित मारुती कांबळे, सागर सोनवणे (सर्व रा. सुभाषनगर) अशी त्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, सुभाषनगरमध्ये राहणारा केदार सातपुते याचा ३१ मार्चला वाढदिवस होता. तो आरसी गँगचा कार्यकर्ता असल्याने सुभाषनगर येथील हनुमान मंदिरासमोर रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी ‘आरसी गँग जिंदाबाद,’ ‘हमसे जो टकरायेगा - मिट्टी में मिल जायेगा’ अशा घोषणा देऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. सराईत गुंड रस्त्यांवर उतरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली. या गोंधळाची माहिती पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक सुनील पाटील ताफ्यासही घटनास्थळी आले. पोलीस आल्याची चाहूल लागताच सर्वजण पसार झाले. कॉन्स्टेबल चंद्रकांत रामचंद्र अवघडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.हद्दपार गॅँगस्टर शहरात कसेरवी शिंदे, रणजित कांबळे, अमित बामणे, सनी साळे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, हाणामारी, खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना हद्दपारही केले आहे. असे असतानाही ते शहरात वाढदिवस साजरा करतातच कसे? पोलिसांच्या नजरेत ते कसे काय येत नाहीत? पोलिसांशी सलगी वाढवून बिनधास्त शहरात वावरणाऱ्या या गॅँगस्टरना वेळीच चाप लावावा, अन्यथा भविष्यात जवाहरनगर-सुभाषनगर खूनसत्र पुन्हा सुरू होईल, अशी भीती येथील नागरिकांत आहे. .बसवेश्वर सोसायटीमध्ये पावणेदोन लाखांचा अपहार

कोल्हापूर : कर्जदाराने थकीत कर्ज भरण्यासाठी दिलेल्या नऊ लाख रुपये रकमेचा गैरवापर करून त्यातील एक लाख ६३ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शुक्रवार पेठ, तेली गल्ली येथील श्री बसवेश्वर को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अधिकाऱ्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित राजेश संभाजी गवळी (वय ४४, डी वॉर्ड, गवळी गल्ली, शनिवार पेठ) असे त्याचे नाव आहे. श्री बसवेश्वर को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयात १३ ते २३ नोव्हेंबर २०१३ दरम्यान हा प्रकार घडला.

पोलिसांनी सांगितले, सोसायटीचे तत्कालीन संचालक अनंत चंद्रकांत सांगावकर (४२, रा. ८०४, डी वॉर्ड, बाजारगेट) हे सोसायटीचे ‘अ’ वर्ग सभासद आहेत. त्यांनी सन २०११ ते २०१६ मध्ये संचालक म्हणून काम केले आहे. संशयित गवळी हा सोसायटीच्या मुख्य कार्यालयात अधिकारी म्हणून काम करतो. त्याच्याकडे कर्जवसुली, ठेवी स्वीकारणे, ठेवी देणे, आदी कामांची जबाबदारी आहे. सोसायटीच्या गडहिंग्लज शाखेतून कर्जदार मनोहर मारुती इंगवले (रा. नेसरी, ता. गडहिंग्लज) यांनी स्थावर तारण खात्यावर ३१ जानेवारी २००१ रोजी सहा लाख रुपये कर्ज घेतले होते. २००६ मध्ये सर्व शाखांचे कामकाज बंद करून संस्थेच्या शुक्रवार पेठ, तेली गल्ली येथील ‘बसव भवन’ येथे कार्यालय सुरू केले. या मुख्य कार्यालयात गवळी हा आॅफिसर म्हणून काम करतो. कर्जदार इंगवले यांचा ३० जानेवारी, २०११ रोजी मृत्यू झाला. संस्थेने त्यांच्या वारसदारांकडे वसुलीची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी अधिकारी गवळी याने दिलेले कर्ज एकरकमी परतफेड योजनेनुसार भरून घेण्यासाठी संस्थेच्या उपसमितीकडूनच या प्रकरणाची मंजुरी घेणे आवश्यक होते. संचालक मंडळाच्या सभेच्या मंजुरीनंतर कर्ज भरून घेणे गरजेचे असताना अधिकाराचा गैरवापर करून कर्जदार यांच्या वारसाकडून १२ नोव्हेंबर २०१३ रोजी ९ लाख रुपये परस्पर स्वीकारले. १३ ते २३ नोव्हेंबर २०१३ दरम्यान त्यांनी दिलेली रक्कम स्वत:साठी वापरली. नऊ लाख रुपयांपैकी कर्जदाराच्या खात्यावर २३ नोव्हेंबर रोजी सात लाख ३७ हजार रुपये भरले. उर्वरित १ लाख ६३ हजार रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी सांगावकर यांनी फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी संशयित गवळी याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर