शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी राजू शेट्टींच्या प्रचारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:44 AM

कोल्हापूर : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खासदार राजू शेट्टी यांनी संसदेत व रस्त्यावरची लढाई लढून ...

कोल्हापूर : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खासदार राजू शेट्टी यांनी संसदेत व रस्त्यावरची लढाई लढून ३४०० कोटींची मदत मिळवून दिली. घरच्या धन्याने आत्महत्या केल्यामुळे उघडा पडलेला संसार त्यामुळे सावरला गेला. या उपकाराची उतराई व्हावी म्हणून १०० वीरपत्नी शेट्टी यांच्या प्रचारात सहभागी झाल्या आहेत. शुक्रवारी त्या हातकणंगलेत दाखल झाल्या. प्रचाराच्या सांगतेपर्यंत गावोगावी जाऊन शेट्टींना निवडून देण्याचे आवाहन करणार आहेत.दुष्काळाने नापिकीचा सामना करणाºया विदर्भ, मराठवाड्यातील शेतकºयांवर कपाशीवर पडलेल्या बोंड अळीने मोठा घाला घातला. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या या शेतकºयांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. कुटुंब उघड्यावर पडल्याची दाहकता सहन न झाल्याने त्या भागाशी काहीही संबंध नसतानाही संवेदनशील शेतकरी या नात्याने खासदार शेट्टी यांनी धाव घेतली. नुकसानग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून विदर्भ, मराठवाड्यात रस्त्यावर उतरून लढाई सुरू केली. आंदोलने करतानाच संसदेतही आवाज उठवला. दबावगट तयार होऊन सरकारला ३४०० कोटींची नुकसानभरपाई जाहीर करणे भाग पडले. भरपाईमुळे आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला.या उपकारातून उतराईसाठीच त्या प्रचारात उतरल्या आहेत. त्यानुसार जालना जिल्ह्यांतील गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालना, परभणी, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांतून या सर्वजणी दाखल झाल्या.कपाशीच्या आंदोलनाची आठवणकपाशीच्या दरावरून आंदोलन करताना गजानन पाटील यांच्यावर १९९७ मध्ये युती सरकारच्या काळात गोळीबार झाला होता. नागपूर-पुणे महामार्गावर आंदोलन करत असताना झालेल्या गोळीबारात त्यांच्यासोबतचे अमरावतीचे दोन सहकारी ठार झाले होते. पाटील यांना पायाला गोळी लागली होती. याची आठवण आजही मनांत असल्याने ताकदीने प्रचारात उतरल्याचे ते सांगतात.शेतकºयांच्या अडचणीच्या काळात भावाप्रमाणे मदतीला धावून आलेल्या शेट्टी यांच्या उपकारांची परतफेड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकºयांसाठी झटणारा शेट्टींसारखा लोकप्रतिनिधी संसदेत पुन्हा पाठविणे आपले कर्तव्य आहे.- गजानन पाटील-बंगाळे, टेंभुर्णी, जि. जालना