लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मलकापूर नगर परिषद क्षेत्राबाहेरील बोगस मतदान नोंदणी रद्द करावी, या मागणीसाठी २८ डिसेंबर रोजी शाहूवाडी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा शिवसेना - राष्ट्रवादी मित्र पक्षाच्या वतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार गुरू बिराजदार यांना दिला आहे .
निवेदनात म्हटले आहे की, मतदान नोंदणीच्या विशेष मोहिमेंतर्गत काही राजकीय मंडळींनी पालिका क्षेत्राबाहेरील बोगस नावे मतदार यादीसाठी दिली आहेत. तसेच बी. एल.ना हाताशी धरून तहसील कार्यालयाकडे सहा अ फार्म दाखल केले आहेत. हद्दीबाहेरील मतदारांची खातरजमा केल्याशिवाय त्यांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करू नयेत. निवेदनावर माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, गटनेत्या माया पाटील, नगरसेवक प्रल्हाद पळसे, सुहास पाटील, संगीता कुंभार, संगीता पाटील, शालन सोनावळे, सुभाष कोळेकर यांच्या सह्या आहेत.