कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने प्रथम आणि द्वितीय वर्षांचा निकाल चुकीच्या पद्धतीने लावला आहे. हा निकाल रद्द करावा, अशी मागणी जिल्हा युवा सेनेने बुधवारी केली. या मागणीचे निवेदन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेण्यात अडचणी असल्याने पूर्वसत्रामधील गुणांच्या आधारावर पदवीच्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या प्रथम, द्वितीय वर्षाचा निकाल जो विद्यापीठाने लावला आहे, त्यात चुकीच्या पद्धतीने गुणांकन मिळाल्याने हजारो विद्यार्थी अनुतीर्ण झाले आहेत.
एखादा विद्यार्थी हा पहिल्या सेमिस्टरमध्ये एखाद्या विषयात अनुत्तीर्ण झाला असेल, तर त्याला दुसऱ्या सेमिस्टरलाही अनुत्तीर्ण दाखवले आहे. हे चुकीचे आहे. त्यामुळे हा चुकीच्या पद्धतीचा निकाल रद्द करावा. त्यामध्ये सुधारणा करावी; अन्यथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा या शिष्टमंडळाने केला.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने, युवती सेनेच्या शीतल कालगोटे, पूनम पाटील, युवा सेनेचे सुदेश आयरेकर, तुकाराम लाखे, साहिल जाधव, प्रसाद जामदार, अथर्व बापट उपस्थित होते.चौकटशिवरायांच्या नावाने अध्यासन सुरू कराछत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, कार्य, त्यांचे विचार अधिक चांगल्या पद्धतीने तरुण पिढीसमोर मांडण्यासाठी विद्यापीठात त्यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरू करावे, अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.