शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

संजय मंडलिक यांची संपत्ती वाढली, धैर्यशील मानेंची घटली; दोघांची एकूण संपत्ती किती.. जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:51 AM

माने-मंडलिक व्यवसायाने शेतकरी

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांची एकूण संपत्ती १४ कोटी ३७ लाख २८ हजार ३९८ रुपये इतकी आहे. मंडलिक यांच्या संपत्तीत २०१९ च्या तुलनेत तब्बल ५ कोटी ६५ लाख रुपयांनी वाढ झाली. खा. मंडलिक यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत विवरणपत्र जोडले आहे. त्यात जंगम मालमत्ता १ कोटी १५ लाख, ३२ हजार ५२५ रुपये असल्याचे म्हटले आहे. तसेच १३ कोटी २१ लाख ९५ हजार ८७३ रुपये किमतीची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती १४ कोटी ३७ लाख २८ हजार ३९८ रुपये इतकी आहे.

गत निवडणुकीवेळी मंडलिक यांची मालमत्ता ९ कोटी ५१ लाख ७१ हजार रुपये इतकी होती. ती आता वडिलोपार्जित मालमत्तेसह १४ कोटी ३७ लाख २८ हजार ३९८ रुपये इतकी झाली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीचा विचार करता त्यांची मालमत्ता ५ कोटी ६५ लाख रुपयांनी वाढली. खा. मंडलिक यांनी स्वसंपादित केलेल्या स्थावर मालमत्तेची खरेदी किंमत १ कोटी १५ लाख ७३ हजार आहे. स्थावर मालमत्तेचा विकासाचा/बांधकामाचा खर्च २ कोटी ८७ लाख ७३ हजार ५२८ आहे. चालू बाजार किंमत १ कोटी ७६ लाख ८५ हजार ४७५ इतकी आहे. स्वसंपादित मूल्य एकूण ४ कोटी १ लाख ४ हजार ३५३ रुपये इतके आहे.वारसामूल्य एकूण ९ कोटी २० लाख ९१ हजार ५२० रुपये आहे. तसेच खा. मंडलिक यांच्या पत्नी वैशाली यांच्या नावे जंगम मालमत्ता ३७ लाख २३ हजार ६८१ रुपये आहे. स्थावर मालमत्ता २० लाख ३८ हजार ८५० रुपये आहे. स्वसंपादित मालमत्तेची खरेदी किंमत ५ लाख २५ हजार आहे. अदमासे चालू बाजार किंमत २० लाख ३८ हजार ८५० रुपये आहे. वैशाली मंडलिक यांच्यावर ७० हजार ९०० रुपयांचे कर्ज आहे.

संजय मंडलिक

  • जंगम : १ कोटी १५ लाख ३२ हजार ५२५ रुपये
  • स्थावर : १३ कोटी २१ लाख ९५ हजार ८७३ रुपये
  • वारसाप्राप्त मालमत्ता : ९ कोटी २० लाख ९१ हजार ५२० रुपये
  • कर्ज : ३ कोटी ४१ लाख १८ हजार
  • वाहने : स्कोडा, ॲक्टिव्हा
  • सोने : ३५ लाख ९२ हजार ५०० रुपये

माने-मंडलिक व्यवसायाने शेतकरीमंडलिक व माने यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नाही. मंडलिक-माने या दोघांनीही आपला व्यवसाय शेतकरी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या पत्नी मात्र व्यावसायिक आहेत.

मंडलिक बीए, बीएडमुरगुड (ता. कागल) येथील मूळ रहिवासी असलेले मंडलिक यांनी १९८९ मधून शिवाजी विद्यापीठातून एमएची पदव्युत्तर पदवी मिळवली. पुढे कागलच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून त्यांनी १९९२ मध्ये बीएड केले.

धैर्यशील माने यांची मालमत्ता झाली ३० लाखांनी कमीहातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांची स्थावर व जंगम मालमत्ता ४ कोटी ४५ लाख ६१ हजार ८२८ रुपये इतकी आहे. गत निवडणुकीपेक्षा मात्र ती ३० लाखांनी कमी झाली आहे. रुकडी (ता. हातकणंगले) येथील रहिवासी असलेल्या माने यांनी रुकडी येथील शेतजमीन, पाचगाव येथील प्लॅाटसची माहिती विवरणपत्रात दिली आहे. गतवेळी माने यांची संपत्ती ४ कोटी ७७ लाख ७१ हजार ३६३ इतकी होती. यात यंदा जवळपास ३० लाख रुपयांनी घट झाली आहे. गतवेळी माने यांच्यावर ४ कोटी १५ लाख ९९ हजार ९५९ रुपयांचे कर्ज होते. सध्या माने यांच्यावर २ कोटी १९ लाख ७५ हजार ६७२ रुपयांचे कर्ज आहे.

धैर्यशील माने

  • स्थावर मालमत्ता : ३ कोटी ५८ लाख रुपये
  • जंगम मालमत्ता : ८७ लाख ६० हजार ८२८ रुपये
  • कर्ज : २ कोटी १९ लाख ७५ हजार ६७२ रुपये

मुक्त विद्यापीठाचे पदवीधरखासदार माने हे मे २०१६ मध्ये नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून बीए झाले आहेत. खासदार माने यांच्या पत्नी वेदांतिका माने यांनी २०१९ पासून २०२३ पर्यंत आयकर विवरण पत्रे भरलेली नाहीत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४sanjay mandlikसंजय मंडलिकdhairyasheel maneधैर्यशील माने