अलीकडे पन्हाळ्यावर बिबट्याचा वावर वाढला आहे. सध्या पन्हाळ्यावर वाहनांची वर्दळ नसल्याने खूपच शांतता आहे. बिबट्याचा रहिवास पावनगड परिसरात असल्याची माहिती मिळत आहे. या परिसरात खूप जणांनी बिबट्या नर-मादी व काही बछडे पाहिल्याचे सांगत आहेत; पण कुठल्याही पाळीव प्राण्यावर अथवा माणसांना त्याने इजा केलेली नाही; पण बिबट्याच्या दहशतीने जंगलात जाण्याचे धाडस कोणीही करीत नाही. डॉ. राज होळकर यांचे घर तबक उद्यानाच्या वरच्या बाजूस एकाकी असल्याने ते नेहमी कुत्रा पाळतात. सलग कुत्रे नाहीसे झाल्याने त्यांनी तीन वर्षांपूर्वी सीसीटीव्ही लावले. त्यामुळे बिबट्या या भक्ष्यासाठी येत असल्याचे दिसून आले. रात्री या बिबट्याने पुन्हा कुत्राला भक्ष्य केल्याने त्यांनी पाळलेला सलग २४ वा कुत्रा बिबट्याने नेला.
फोटो-------
बिबट्या भक्ष्य पकडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.