कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव आज, शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता होणार आहे. यानिमित्त चांदीच्या रथाला विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते. जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा व तिसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव असतो. रात्री साडेआठ वाजता रथोत्सवास सुरुवात होईल. महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे पुन्हा महाद्वार येथे येऊन रथोत्सवाचे विसर्जन होईल. यावेळी मिरवणूक मार्गावर रांगोळ्या व रथावर पुष्पवृष्टी भाविकांकडून केली जाते. शाहू गर्जना ढोलपथकाचे आकर्षणयावर्षी कोल्हापूरच्या शाहू गर्जना ढोलपथकाला रथोत्सवात सादरीकरणाची संधी मिळाली आहे. या पथकाद्वारे सहा हात, महालक्ष्मी यंत्र, शिवतांडव, काटेवाडी, शिवस्तुती, तालठेका, कल्लोळ व इतर प्रकारचे तालबद्ध वादन होणार आहे. शाहू गर्जना ढोलपथक यंदाच्या रथोत्सवाचे आकर्षण असेल.
करवीरनिवासिनी अंबाबाईचा रथोत्सव
By admin | Published: April 22, 2016 12:34 AM