कोल्हापूर : उत्कंठा शिगेला पोहोचविणारे प्रदर्शन! ज्यामध्ये एकाच छताखाली मिळणार आहे परिपूर्ण मार्गदर्शन आणि करिअरच्या दिशा निश्चित करण्याचा मार्ग. बारावीचा निकाल नुकताच लागला असून दहावीचाही निकाल लवकरच लागेल. काहीजणांना काय करायचे ते पक्के ठाऊक असले तरी कोणता कोर्स कुठून करावा, याबाबतचा आपल्या मनातील गोंधळ दूर करणाऱ्या व सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेल्या ‘रोबोमेट प्लस’ प्रस्तुत ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१६’ या प्रदर्शनाला उद्या, शनिवारपासून सुरुवात होत आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रांत नेहमीच पुढाकार घेणाऱ्या ‘लोकमत’ समूहातर्फे यंदाही ‘अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ अर्थातच भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन ४ ते ६ जूनदरम्यान राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात केले आहे.केवळ बारावीच्याच नव्हे तर सर्वच विद्यार्थ्यांना ‘अॅस्पायर एज्युकेशन फेअर’ फायद्याचे ठरणार आहे. यामधून पाल्याने कोणता कोर्स करावा, दर्जेदार शिक्षण देणारी संस्था कोणती यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला आपसूकच मिळतील. महाविद्यालये, शाळा, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, फॅशन, ग्राफिक्स, इंटिरिअर डिझायनिंग व रिटेल, आयटीआय, एव्हीएशनपासून मीडिया, अॅनिमेशन, गेमिंगपर्यंतची माहिती इथे मिळेल. तसेच विविध विद्यापीठे, प्रोफेशनल क्लासेस, हॉटेल मॅनेजमेंट, फॉॅरिन लॅँग्वेजेस, स्पोकन इंग्लिश, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, कॅपिटल मार्केट यासह मुंबई, पुणे, नागपूर या शहरांतील अनेक नामवंत संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. अवघे शिक्षणक्षेत्र एकाच छताखाली अवतरणार आहे, हे निश्चित. यामुळे पालकांचाही मोठ्या शहरांत जाऊन संस्थेची माहिती घेण्यासाठी जाणारा वेळ व पैसा वाचणार आहे. शिक्षण संस्थांसाठी हे प्रदर्शन म्हणजे सुवर्णसंधी ठरणार आहे; कारण याद्वारे हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेची माहिती एकाच वेळी पोहोचविणे शक्य होणार आहे. प्रत्येकाशी संवाद साधून आपल्या व्यावसायिकांना आपल्या संस्थेविषयी माहिती देता येईल. यानिमित्ताने एक नवाच वर्ग आपल्या संस्थेशी जोडला जाईल. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक रोबोमेट प्लस हे असून डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अॅँड इंजिनिअरिंग हे सहप्रायोजक आहेत, तर दि न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड, ट्रिनिटी व शिवगंगा सुझुकी, उद्यमनगर हे सहायक प्रायोजक आहेत.हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत असून जास्तीत जास्त इच्छुकांनी भेट देऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी).$$्रिदिनांकवेळवक्त्याचे नावविषय/ मार्गदर्शन४ जून, शनिवारीसकाळी ११ वाजता-कोल्हापूर एज्युकेशन आयडॉल-३ स्पर्धादुपारी १२.३० वाजता - आॅनलाईन फॉर्म कसा भरावा सायंकाळी ५ वाजताअभिजित शर्मा परीक्षेचे बदलते स्वरूप ५ जून, रविवारी :सकाळी ११ वाजताडॉ. चारूदत्त रणदिवेमुलांच्या क्षमतेनुसार करिअर कसे निवडावेदुपारी १२.३० वाजताचातक देशपांडेकरिअर इन बॅँकिंगदुपारी २ वाजता-सायन्स पंडित स्पर्धासायंकाळी ५ वाजतासुरेंद्र सिंगआता शिक्षण झालं अधिक सोप्पं सायंकाळी ६ वाजताव्ही. एस. मोरुसेडिप्लोमा इंजिनिअरिंगमधील करिअर संधी६ जून, सोमवारी सकाळी ११ वाजतामनीषा पोवारसायन्समधील करिअर संधीदुपारी १२ वाजतासुनील पाटील-सुधीर शिंदे स्पर्धा परीक्षेमधील करिअर संधीदुपारी ४ वाजता प्राचार्य दयानंद देवमोरे हाऊ टू सिलेक्ट करिअरसायंकाळी ५ वाजता -गुणवंतांचा सत्कारसायंकाळी ६ वाजता सुरेंद्र सिंगव्यक्तिमत्त्व विकास
एकाच छताखाली मिळणार करिअर मार्गदर्शन
By admin | Published: June 03, 2016 1:06 AM