शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

‘दौलत’ची काळजी नक्की कुणाला?

By admin | Published: September 20, 2016 11:32 PM

कारखाना येत्या हंगामापासून सुरू होणार का? : न्युट्रियन्टस् ‘करारा’च्या विरोधातून चंदगडी राजकारणाचा नवा डाव--कारण राजकारण

राम मगदूम -- गडहिंग्लजपाच वर्षे बंद असलेला दौलत सहकारी साखर कारखाना येत्या हंगामापासून सुरू होण्याची चिन्हे दिसत असतानाच ‘चंदगडी राजकारणा’ने पुन्हा एकदा कारखान्याभोवती फेर धरायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच शेतकरी-कामगारांची पर्यायाने ‘दौलत’ची काळजी नेमकी कुणाला आहे? असा सवाल थेट विचारला जात आहे.चंदगड तालुक्यात ‘दौलत’मुळेच शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले; मात्र ते सोन्याचे दिवस फार काळ टिकले नाहीत. बेसुमार नोकरभरती, नियोजनशून्य कारभार आणि राजकारणासाठी कारखान्याचा वापर यामुळेच शेतकऱ्यांची ‘दौलत’ आर्थिक अरिष्टात सापडली. चंदगडच्या नेत्यांनी पाटणे फाट्यापासून मुंबई-दिल्लीपर्यंत कित्येक बैठका केल्या. मात्र, इलाज सापडला नाही. दरम्यान, कारखाना चालवायला आलेल्या तासगावकर शुगर मिल, ‘भारत विकास’ या कंपन्यांना पळवून लावण्यात आले. नेट-वेट फायनान्स, विद्या पेपर मिल, कामत आणि कंपनी, मुजावर आणि कंपनी, केशव शुगर या कंपन्यांच्या नावाची केवळ चर्चाच झाली. ‘थिटे पेपर मिल’ने तर ‘दौलत’च्या मालकांना आणि जिल्हा बँकेला चांगलाच धडा शिकविला. या ना त्या कारणामुळे कारखान्याचे धुराडे गेली पाच वर्षे बंद आहे. ऊस बिलाचे पैसे देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने साखर जप्तीची कारवाई केली. तोही वाद न्यायालयात गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे देणे अजूनही थकीत आहे. आपल्या थकीत कर्जवसुलीसाठी जिल्हा बँकेने कारखाना ताब्यात घेतला. कारखाना विक्रीत काढण्यासंदर्भातही विचार झाला; मात्र शेतकऱ्यांच्या घामातून उभारलेली ‘दौलत’ टिकावी म्हणून कारखाना चालवायला देण्याचा निर्णय घेऊन बँकेने दहावेळा निविदा काढली, पण प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर गोकाकच्या ‘न्युट्रियन्टस्’ कंपनीच्या निविदेबाबत सकारात्मक निर्णय घेऊन बँकेने कारखाना चालवायला दिला.दरम्यान, चंदगड तालुक्यातील तथाकथित काही ‘दौलत’च्या हितचिंतकांनी न्यायालयात धाव घेऊन कंपनीच्या करारालाच आव्हान दिले आहे. त्यांचे मुद्दे ‘रास्त’ असले तरी कारखाना सुरू होण्यात ‘व्यत्यय’ आणणार आहेत. न्यायालयीन अडथळ्यामुळे या हंगामातही कारखाना सुरू न झाल्यास कारखान्याचा परवाना रद्द होण्याचा धोका आहे. तसे झाल्यास कारखान्याच्या विक्रीशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही आणि तो कधीच ‘दौलत’ व तालुक्याच्या भल्याचा असणार नाही.‘करारा’ला विरोध का?जिल्हा बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ हे स्वत: थकीत कर्जदारांच्या दारोदारी फिरत आहेत. कारखाना व बँकेच्या हितासाठीच त्यांनी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या माध्यमातून ‘न्युट्रियन्टस्’ला कारखाना चालवायला दिला आहे. मात्र, विधानसभेला पहिल्याच प्रयत्नात २८ हजार मते घेतलेले ‘अप्पी’ यांच्यामुळे कारखाना सुरू झाला तर ते कायमपणे आपल्या डोक्यावर बसतील, अशी भीती तथाकथित पुढाऱ्यांना आहे. म्हणूनच त्यांचा ‘करारा’ला विरोध आहे, हेही आता लपून राहिलेले नाही.