मुंबई वडाळा येथे वास्तव्यास असलेली वैशाली वासुदेव परब ही महिला मालवण येथील सासरहून पाटगावला माहेरी चालली होती. यावेळी ही महिला शनिवारी (दि. २७ फेब्रुवारी) गारगोटी-शिवडाव गाडीने प्रवास करून पाटगाव येथे उतरली. दुसर्या दिवशी आपली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी गाडीतील आसनावरच विसरले असल्याचे लक्षात आले. या महिलेने थेट गारगोटी आगाराशी संपर्क साधला असता आपली पिशवी आगारात जमा असल्याचे सांगण्यात आले. पिशवीतील दागिने व रोख रक्कम सुरक्षित असल्याचे पाहून संबंधित महिलेचा जीव भांड्यात पडला.
भुदरगड पंचायत समिती उपसभापती सुनील निंबाळकर, आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांच्या हस्ते महिलेला सोन्याचे दागिने व रोकड देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते वाहक संतोष डांगे, चालक अशोक कांबळे यांचा सत्कार झाला.
यावेळी वाहतूक निरीक्षक मच्छिंद्रनाथ ढोंगे, रोहन देसाई, सुहास महाडिक, तानाजी संकपाळ, आदींसह एसटी कर्मचारी उपस्थित होते.
फोटो :
एसटीत सापडलेले दागिने परत करताना सभापती निंबाळकर, आगारप्रमुख दिलीप ठोंबरे, संतोष डांगे, अशोक कांबळे, आदी.