सरदार चौगुले
पोर्ले तर्फ ठाणे : सह्याद्री डोंगरकडांच्या रांगेचा वारसा लाभलेला पन्हाळा गडाच्या पायथ्यालगत असणाऱ्या कडांचा भूभाग अतिवृष्टीमुळे खचून वर्षानुवर्ष होणारे भूस्खलनाचे प्रमाण वाड्यावस्त्यांसाठी चिंताजनक बनत आहे. मंगळवारपेठ, बांधेवाडी, गुरुवारपेठ, मराठेवाडी, जांभळेवाडी या गावात भूस्खलनाची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुसळधार पावसामुळे पन्हाळ्याच्या पश्चिम भागातील धामणी खोऱ्यातील डोंगराळ भागात मानवी हस्तक्षेपामुळे जमिनीच्या झालेल्या सपाटीकरणामुळे हरपवडे, आंबर्डे, पणुत्रे आदींसह आठ गावांत भूस्खलनामुळे शेती धोक्यात आली आहे. भूस्खलनामुळे डोंगरातील माती, शेकडो हेक्टर शेती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या बुधवारपेठ, मंगळवारपेठ, नेबापूर, गुरुवारपेठ, आपटी, तुरूकवाडी, बांदेवाडी, वेखंडवाडी, मराठवाडी, म्हाळुंगे, खळेखोडवाडी आदी गावांना २००५ पासूनच्या अतिवृष्टीमुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. तांबड्या रंगाच्या मातीचा वाढता ढिसाळपणा आणि बेसुमारपणे झालेली वृक्षतोड याला कारणीभूत आहे. मराठवाडी येथे २००५ ला भूस्खलन झाले. त्यापासून आजूबाजूच्या परिसरात भूस्खलनाची मालिका सुरू झाली आहे. त्यानंतर प्रशासनाने भूस्खलनाचा धोका ओळखून सुरक्षेच्या दृष्टीने गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावांना स्थलांतरित होण्यासाठी वारंवार सूचना केल्या; पण ग्रामस्थ गावे सोडून जाण्यास इच्छुक नाहीत.
पन्हाळा गडावरून पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य रितीने होत नसल्याने पाणी कडाच्या बाजून वाहत जाते.भूभागात पडलेल्या भेगांमधून पाणी शिरल्याने कडा कोळसळ्याचे प्रमाण वर्षानुवर्षे वाढत आहे.भूस्खलन होणाऱ्या गावातील लोकांना प्रशासनाने स्थलांतरीत होण्याचा प्रस्ताव देऊनही तेथील ग्रामस्थ स्थलांतरीतबाबत नकारात्मक आहे.त्यामुळे या गावांचे स्थलांतर प्रशासनासाठी कसोटीचे बनले आहे.वर्षानुवर्षे भूस्खलनाचे वाढते प्रमाण भूस्खलन प्रणव भागासाठी धोक्याचे असल्याने वेळेत या गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन झाले नाही तर भविष्यात मोठी हानी होऊ शकते.यंदा मंगळवारपेठेतील झालेल्या भूस्खलन अनुभव भयानवह आहे.
............
जमीनीचे सपाटीकरण भोवले
पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात असणाऱ्या धामणी खोऱ्याच्यी डोंगराळ भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे.डोंगरातील झाडे तोडून नाले ओढे मुजवून त्या जमीनीचे सपाटीकरण केल्या भागातील माती वाहून आली आहे.अतिवृष्टीमुळे गोठे, तांदुळवाडी, आकुर्डे, पणूत्रे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी, पणोरे गावांच्या वरील बाजूस असणाऱ्या डोंगराचे भूस्खलन झाले आहे.यामुळे डोंगर भागात असलेली अनेकांची शेतीसह झाडे दगड गोठे जमिनीत गाढले गेली.डोंगरावरील माती गावातील अनेकांच्या शेकडो हेक्टर शेत जमिनीत शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे.
..........
पाईटर
१ यावर्षी बुधवारपेठ ते पन्हाळा दरम्यानचा म्हणजे मंगळवारपेठेच्या वरचा भागाचे भूस्खलन होऊन मुख्य रस्ता घसरून वाहतुक ठप्प झाली आहे.
२ बुधवारपेठेच्या वरचा म्हणजे पावनगडाची तटबंदी यावर्षी घसरून खाली आली आहे.
३ आपटी ते म्हाळूंगे दरम्यानच्या रस्त्यावर डोंगराचा भाग घसरून आला आहे.तर २०१९ च्या अतिवृष्टीतही या ठिकाणी भूस्खलन झाले होते.
४ मसाई पठार येथील दळवेवाडी ते कणेरीपैकी धनगरवाडा या दरम्यानच्या असणाऱ्या डोंगराला ठिकठिकाणी भूस्खलन झाल्याने डोंगरावरील माती घसरत आहे.या ठिकाणच्या रस्त्याला भेंगा पडून रस्ता उधसला आहे.त्यामुळेच भागात भविष्यात भूस्खलनाचा धोका वाढू शकतो.
०१ निवाचीवाडी
निवाचीवाडी (ता.पन्हाळा) येथील डोंगरीतील अतिवृष्टीमुळे भूस्खलनामुळे वाहून आलेली माती शेती पिकात पसरल्याने नुकसान झाले आहे.