कोल्हापूर : माणगाव (ता.हातकणंगले)येथील स्मारकाच्या लोकार्पण २१ व २२ मार्चला होणार आहे. यासाठी सर्व यंत्रणांना त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदऱ्या काटेकोरपणे पार पाडव्यात असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे दिले. २१ व २२ मार्चला हा सोहळा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या माणगाव येथील परिषदेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं सामाजिक न्याय विभागामार्फत बांधण्यात आलेल्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा २१ व २२ मार्च रोजी होणार आहे.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती खासदार धैर्यशील माने,जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, सरपंच ज्योती कांबळे, उप सरपंच राजगोंडा पाटील, आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जि.प.समाज कल्याण सभापती स्वाती सासणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे,जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संभाजी माने प्रमुख उपस्थित होते.माणगाव येथे होणा?्या लोकोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील रस्त्यांचे नियोजन शासन व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने समन्वयाने करावे. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छता, सपाटीकरण आदी उद्यापासूनच सुरुवात करावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी आरोग्य, मंडप,स्टेज, बैठक व्यवस्था, विद्युत व्यवस्था, पिण्याचे पाणी, फिरती शौचालये, बॅरेकेट्स, पोलीस बंदोबस्त, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी पथकेही तैनात ठेवावित यासाठीच्या नियोजनाचा कृती आराखडा तात्काळ तयार करुन त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश पालमंत्र्यांनी दिले.यावेळी इचलकरंजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार प्रदीप उबाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, समाज कल्याण अधिकारी दिपक घाटे, वैद्यकीय अधिकारी फारुक देसाई, वास्तूविशारद अमरजा निंबाळकर आदी उपस्थित होते.