शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख, एकास बेदम मारहाण; गोकुळच्या संचालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 1:42 PM

फिर्यादी कांबळे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ‘तुला गावात राहू देणार नाही’ अशी धमकी दिली, असा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे.

गगनबावडा : कोरोना सक्तीच्या लसीकरणा विरोधात आंदोलनात भाषण करताना नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचा जाब विचारत  बहुजन मुक्ती पार्टीच्या गगनबावडा तालुकाध्यक्ष यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी गोकुळच्या संचालकांसह सहा जणांविरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गोकुळचे संचालक बयाजी शेळके (रा.वेसरफ), सहदेव कांबळे, तुकाराम पाटील (दोघे रा. कोदे), शिवाजी राऊत (रा. निवडे), निलेश म्हाळुंगेकर (रा. निवडे), सूर्यकांत पडवळ (रा. मांडुकली पैकी खोपडेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणदूर ता. गगनबावडा येथील ज्ञानदेव बापू कांबळे (वय ४०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यातील संशयितांनी ज्ञानदेव कांबळे यांना बोलेरो मध्ये बसवून साळवण येथील अरविंद खाटीक यांच्या दुकानासमोर आणले. दुकानात गोकुळचे संचालक बयाजी शेळके होते. शेळके यांनी मोबाईलमध्ये फिर्यादीने कोरोना लसीच्या सक्तीविरोधात कलेक्टर ऑफिस समोर केलेल्या आंदोलनातील भाषणाचा व्हिडिओ ज्ञानदेव कांबळे यांना दाखवला. फिर्यादी कांबळे यांनी एका नेत्याचा एकेरी उल्लेख केला होता. नेत्याचा एकेरी उल्लेख का केला? असा जाब विचारत संशयित सहदेव कांबळे याने फिर्यादीला  मारहाण केली. त्यानंतर शेळके, पडवळ, पाटील, राऊत, म्हाळुंगेकर या संशयितांनी फिर्यादी कांबळे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ‘तुला गावात राहू देणार नाही’ अशी धमकी दिली, असा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी